Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भोजापूर चारीच्या विस्तारीकरणामुळे पाणीप्रश्न सुटणार; ३० कोटींचा प्रस्ताव सादर
राजकारण

भोजापूर चारीच्या विस्तारीकरणामुळे पाणीप्रश्न सुटणार; ३० कोटींचा प्रस्ताव सादर

आमदार अमोल खताळ यांनी ही मनोगत व्यक्त केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर / शिर्डी: 

भोजापूर चारीच्या विस्तारीकरणासाठी ३० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात या चारीचा समावेश झाल्याने या भागातील पाणीप्रश्न लवकरच कायमस्वरूपी सुटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या चाळीस वर्षांपासून रखडलेल्या भोजापूर चारीला अखेर पाणी मिळाले असून, यानिमित्ताने संगमनेर तालुक्यातील तिगाव येथे जलपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री विखे पाटील बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, जलसंधारण विभागाचे अभियंता हरीभाऊ गीते, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तसेच परिसरातील शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले की, भोजापूर चारीचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाने दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. यामुळे हे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झाला आहे. आता ही चारी जलसंपदा विभागाकडे वर्ग झाल्यामुळे भविष्यातील कामांना गती मिळेल.

भोजापूर चारीच्या विस्तारीकरणासाठी ३० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला लवकरच अंतिम मंजुरी मिळेल, अशी आशा आहे. या विस्तारीकरणामुळे पाणी वहनाची कार्यक्षमता वाढेल, पूर नियंत्रणात मदत होईल, आणि अधिक शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल.

दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात भोजापुर चारीचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे ३३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचा अहवाल अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल.

या व्यतिरिक्त, साकूर आणि आसपासच्या गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी एक स्वतंत्र योजना तयार करण्यात येत असून, तिचाही लवकरच प्रारंभ होईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. आमदार अमोल खताळ यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,016
अमोल खताळ राधाकृष्ण विखे विजापूर चारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.