Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » २४ तास उलटले तरी प्रवरा नदीच्या प्रवाहात बेपत्ता झालेल्या तरुणाचा प्रशासनाकडून अद्यापही शोध सुरू, आमदार सत्यजित तांबेंच्या प्रशासनाला सूचना
महाराष्ट्र संवाद विशेष

२४ तास उलटले तरी प्रवरा नदीच्या प्रवाहात बेपत्ता झालेल्या तरुणाचा प्रशासनाकडून अद्यापही शोध सुरू, आमदार सत्यजित तांबेंच्या प्रशासनाला सूचना

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन अधिक माहिती घेत शोध कार्याला वेग देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 27, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी: शहरातील प्रवरा नदीच्या पात्रात मंगळवारी रात्रीच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी गेलेले विजय संभाजी कुटे (वय अंदाजे ४०) हा तोल जाऊन वाहत्या पाण्यात पडल्याने बेपत्ता झाला आहे. या घटनेमुळे संगमनेर शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून, त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिक आणि प्रशासन कसून प्रयत्न करत आहेत.

दरम्यान अद्यापही शोध कार्य सुरू असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी दिली आहे.

ही घटना मंगळवारी रात्री सुमारे साडेदहा वाजेच्या दरम्यान प्रवरा नदीवरील छोट्या पुलावर घडली. मूळचे रंगार गल्ली, संगमनेर येथील रहिवासी असलेले विजय कुटे हे आपल्या स्कुटी गाडीवरून कचरा टाकण्यासाठी आले असल्याची माहिती चर्चेत आहे. कुटे आपली दुचाकी गाडी स्टँडवर उभी करत असतानाच त्यांचा पाय स्टँडमध्ये अडकून ते तोल गेल्याने वाहत्या पाण्यात पडले. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने ते काही वेळातच बऱ्याच अंतरावर वाहून गेले आणि त्यानंतर अदृश्य झाले.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शोध मोहीम सुरू केली. बुधवारी देखील उशिरापर्यंत हे शोध मोहीम सुरू होती. मात्र, रात्रीचा अंधार आणि नदीतील प्रवाहामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन अधिक माहिती घेत शोध कार्याला वेग देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,196
प्रवरा नदी बेपत्ता
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

विहिरीत आढळलेल्या महिलेची ओळख पटली मृत्यूचे गूढ; पोलिसांकडून तपास सुरू

June 3, 2026

संगमनेरमधील अकोले बायपासवरील भाजीबाजार हटवला; पोलीस आणि भाजीपाला विक्रेत्यांमध्ये प्रचंड हायव्होल्टेज ड्रामा, एक ताब्यात

June 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

By अनंत पांगारकरJune 4, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | मुंबई/बुलढाणा: भारतीय जनता पक्षाला देशात लोकशाही नको असून, ‘इलेक्शन सिस्टिम’…

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.