Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या विकासाला गती! रस्ते मजबुतीकरणासाठी ८५ लाखांचा निधी मंजूर – आमदार सत्यजित तांबे
राजकारण

संगमनेरच्या विकासाला गती! रस्ते मजबुतीकरणासाठी ८५ लाखांचा निधी मंजूर – आमदार सत्यजित तांबे

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीमुळे एकेकाळी दुष्काळी असलेला संगमनेर तालुका आज 'वैभवशाली तालुका' म्हणून ओळखला जातो. त्यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याच्या विकासाला आणखी बळ मिळाले आहे. तालुक्यातील विविध रस्त्यांच्या मजबुतीकरण आणि रुंदीकरण कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. या निधीमुळे तालुक्याचे रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत आणि सुलभ होणार आहे.

आमदार सत्यजित तांबे यांनी या निधी मंजुरीबद्दल सांगितले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीमुळे एकेकाळी दुष्काळी असलेला संगमनेर तालुका आज ‘वैभवशाली तालुका’ म्हणून ओळखला जातो. त्यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२५-२६ अंतर्गत ३०५४, ३०६८ ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेतून जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा निधी मंजूर झाला आहे.

या निधीतून तालुक्याच्या विविध भागांतील महत्त्वाच्या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. या कामांमध्ये खालील रस्त्यांचा समावेश आहे.

मंगळापूर: राष्ट्रीय महामार्ग ५० ते मंगळापूर रस्ता सुधारणा – १५ लाख रुपये

निमगाव बुद्रुक: नांदुरी दुमाला ते निमगाव बुद्रुक रस्ता सुधारणा – १५ लाख रुपये

धांदरफळ खुर्द: धांदरफळ खुर्द ते डोंगरे वस्ती रस्ता सुधारणा – १५ लाख रुपये

वडगाव लांडगा: जवळेकडलग रस्ता सुधारणा – १० लाख रुपये

धुपे: दिघे वस्ती रस्ता सुधारणा – १० लाख रुपये

चिखली: मेमाने वस्ती रस्ता सुधारणा – २० लाख रुपये

या निधीमुळे रस्त्यांची गुणवत्ता सुधारणार असून, नागरिकांची दळणवळणाची सोय अधिक चांगली होणार आहे.

या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंगळापूर, चिखली, धुपे, निमगाव बुद्रुक, धांदरफळ खुर्द, वडगाव लांडगा आणि जवळेकडलग येथील ग्रामस्थांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांचे आभार मानले आहेत.


काम बोलते, नाणं खणखणीत आहे!

बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांचा वेग कायम आहे. या निधी मंजुरीनंतर, ‘काम बोलते, नाणं खणखणीत आहे’ अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीत काही लोक नकारात्मक भूमिका घेत असले, तरी संगमनेरची शांतता आणि विकासाची गती ही बाळासाहेब थोरात यांच्या कामाची साक्ष देत आहे, असे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे शहरातील व तालुक्यातील नागरिक पुन्हा एकदा थोरात यांच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 899
बाळासाहेब थोरात रस्ते सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.