Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगराध्यक्षपदाच तर ठरलं, आता लक्ष उद्याच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीकडे; २०१६ नंतर पुन्हा निवडणुकीचा आखाडा रंगणार!
निवडणूक

नगराध्यक्षपदाच तर ठरलं, आता लक्ष उद्याच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीकडे; २०१६ नंतर पुन्हा निवडणुकीचा आखाडा रंगणार!

संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी महिलेची वर्णी लागणार असल्याने संगमनेर नगर परिषदेमध्ये पुन्हा एकदा 'महिलाराज' बघावयास मिळणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – सोमवारी संगमनेर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर आता लक्ष बुधवारी होत असलेल्या प्रभागनिहाय आरक्षणाकडे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांचे लक्ष लागले आहे. प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी साडेदहा वाजता पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण निश्चित केले जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे २०१६ नंतर पुन्हा एकदा पालिका निवडणुकीचा आखाडा रंगणार आहे. आरक्षण निश्चित होताच इच्छुकांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात होईल. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर प्रत्येक प्रभागातून इच्छुकांची मोठी संख्या समोर येत असली तरी कुठला प्रभाग कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होतो. यावर राजकीय गणित ठरणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

१५ प्रभागांमधून ३० जागांसाठी निवडणूक होत आहे. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवकांची पालिकेत वर्णी लागणार असून त्या दृष्टीने अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी महिलेची वर्णी लागणार असल्याने संगमनेर नगर परिषदेमध्ये पुन्हा एकदा ‘महिलाराज’ बघावयास मिळणार आहे.

अशातच पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांची बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर अद्याप शासनाकडून कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेले नाही. त्यामुळे, अकोले नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी धनश्री पवार यांच्याकडे संगमनेर नगर परिषदेचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. पवार यांनी या पार्श्वभूमीवर संगमनेर नगरपालिका निवडणुकीची सूत्रे हाती घेतली आहे.

बुधवारच्या आरक्षणानंतर संगमनेर नगर परिषदेचे कोणते प्रभाग अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी राखीव होतात याकडे लक्ष लागले आहे. त्यानंतर राखीव प्रभागातील उमेदवार शोधण्याचे मोठे आव्हान सर्व पक्षांसमोर असेल. तर ९ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांकडे हरकती दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 741
अरुण उंडे धनश्री पवार प्रभाग निहाय आरक्षण संगमनेर नगरपरिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या उभारणीला गती

01/07/2026

संगमनेर उपविभागातील ८ सराईत गुन्हेगार एकाच वेळी तडीपार; पोलीस प्रशासनाचा मोठा दणका!

29/06/2026

संगमनेर नगरपरिषदेचा दणका: भाजप नेत्याच्या मुलाविरुद्ध अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश

06/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.