Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ: राष्ट्रवादीचा युवक नेता आईसह भाजपच्या वाटेवर?
राजकारण

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ: राष्ट्रवादीचा युवक नेता आईसह भाजपच्या वाटेवर?

अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे आगामी अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/10/2025Updated:23/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर: आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (राष्ट्रवादी शरद पवार गट) युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची शिर्डी येथे भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या पंधरा दिवसांतील भांगरे आणि विखे-पाटील यांच्यातील ही दुसरी भेट असल्याने अमित भांगरे ‘तुतारी’ सोडून ‘कमळ’ हाती घेणार का, याबद्दल तर्क-वितर्कांना जोर आला आहे.

भांगरे यांनी त्यांच्या आई सुनीता भांगरे यांच्यासह विखे-पाटील यांच्याशी शासकीय विश्रामगृह येथे बंद दाराआड चर्चा केली. या बैठकीला भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांचीही उपस्थिती होती.

अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे आगामी अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे. या पार्श्वभूमीवर, अमित भांगरे यांच्या आई सुनीता भांगरे अकोले तालुक्यातून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. अध्यक्षपदाचे आरक्षण आणि सुनीता भांगरे यांची तयारी पाहता, त्यांना भाजपच्या माध्यमातून संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या भेटींमुळे, ऐन निवडणुकीच्या तोंडावर अमित भांगरे हे शरद पवारांची साथ सोडणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. भांगरे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी दाट शक्यता राजकीय गोटात व्यक्त होत आहे, यामुळे शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी विधानसभा निवडणूक लढवताना भांगरे यांनी अनेक जाहीर सभांमध्ये ‘आम्ही बाप बदलत नाही, माझा राजकीय बाप शरद पवारच’ असे ठामपणे सांगितले होते. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आता त्यांच्या भूमिकेत बदल होण्याची शक्यता आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,455
अमित भांगरे भारतीय जनता पक्ष राधाकृष्ण विखे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शरद पवार सुनिता भांगरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या…

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.