Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या केशवतीर्थाला आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून स्मार्ट टच! महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र ई-टॉयलेट्स आणि चेंजिंग रूम लवकरच
विकास

संगमनेरच्या केशवतीर्थाला आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून स्मार्ट टच! महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र ई-टॉयलेट्स आणि चेंजिंग रूम लवकरच

आमदार सत्यजीत तांबे यांनी शहरातील तरुणांसाठी खेळ आणि क्रीडा संस्कृती वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी जोर्वे नाका परिसरात भव्य क्रीडांगण उभारण्यासाठी आणखी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेर शहराचा सर्वांगीण विकास गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत असून, शहराने आज स्वच्छता, नियोजन आणि आधुनिकतेच्या बाबतीत एक आदर्श स्थान मिळवले आहे. नगरपरिषदेला मिळालेली विविध पारितोषिके हे या यशाचे उत्तम उदाहरण आहे. शहरात वाढत्या नागरिकांच्या वर्दळीचा आणि त्यांच्या सोयींचा विचार करून आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर शहरातील ई-टॉयलेट्ससाठी फेब्रुवारी २०२५ मध्ये एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता.

धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असलेल्या प्रवरानदीवरील केशवतीर्थ घाटावर, दहाव्याच्या विधीच्या वेळी महिला व पुरुषांना कपडे बदलण्यासाठी योग्य सुविधा मिळत नव्हत्या. नागरिकांची ही मोठी अडचण लक्षात घेऊन आमदार तांबे यांनी पुढाकार घेतला आहे.

काल (गुरुवार, २३ ऑक्टोंबर) आमदार तांबे यांनी केशवतीर्थ घाट परिसरात ई-टॉयलेट्स व चेंजिंग रूम उभारण्यासाठी दोन ठिकाणांची पाहणी केली. त्यांनी संगमनेर नगरपरिषदेचे अभियंता पंकज मुंगसे यांना बोलावून आपल्या निधीतून केशवतीर्थ परिसरात महिला आणि पुरुषांसाठी तात्काळ दोन स्वतंत्र ई-टॉयलेट्स आणि चेंजिंग रूम उभारण्याच्या सूचना दिल्या.

या सुविधेमुळे केशवतीर्थ येथे धार्मिक विधींसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, घाट परिसर स्वच्छतेच्या आणि सोयीच्या दृष्टीने अधिक सुसज्ज होईल. केशवतीर्थावर उभारल्या जाणाऱ्या या ई-टॉयलेट्समध्ये स्मार्ट सेन्सर तंत्रज्ञान, टचलेस ऑपरेशन सिस्टीम, सोलर लाइटिंग आणि वॉटर रिसायकलिंग युनिट अशा आधुनिक सुविधा असणार आहेत. हे तंत्रज्ञान ई-टॉयलेट्सना स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर बनवेल. या अत्याधुनिक सुविधेमुळे घाट परिसर स्वच्छ, आकर्षक आणि पर्यावरणपूरक ठेवण्यास मदत होणार आहे.

शहराच्या क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन – याचबरोबर आमदार सत्यजीत तांबे यांनी शहरातील तरुणांसाठी खेळ आणि क्रीडा संस्कृती वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी जोर्वे नाका परिसरात भव्य क्रीडांगण उभारण्यासाठी आणखी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या माध्यमातून संगमनेरच्या तरुणाईला दर्जेदार सुविधा मिळणार असून, त्यांच्या प्रतिभेला नवी दिशा मिळेल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 696
इ टॉयलेट केशव तीर्थ सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.