Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या राजकारणात मोठा फेरबदल…! महायुती आणि महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा, ‘एमआयएम’ नगरपालिकेसह जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उतरणार; नगराध्यक्षपदासाठी उमेदवार निश्चित
राजकारण

संगमनेरच्या राजकारणात मोठा फेरबदल…! महायुती आणि महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा, ‘एमआयएम’ नगरपालिकेसह जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उतरणार; नगराध्यक्षपदासाठी उमेदवार निश्चित

आगामी नगरपालिका निवडणुकीत एमआयएमची एन्ट्री झाल्यास राजकीय गणिते बदलू शकतात. नगरसेवकांचे थेट नगराध्यक्ष पदासाठी एमआयएम कडून उमेदवार मैदानात उतरवला जाण्याची चिन्ह निर्माण झाली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/10/2025Updated:25/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये मोठा राजकीय फेरबदल घडला आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये एमआयएम (AIMIM) पक्ष आपले उमेदवार उभे करणार असल्याची व त्यासाठी पक्षप्रमुख माजी खासदार इम्तियाज जलील हे संगमनेरात लवकरच यासंबंधीची घोषणा करणार असल्याची माहिती एमआयएमचे शहराध्यक्ष दानिश मिर्झा यांनी दिली आहे.

आगामी नगरपालिका निवडणुकीत एमआयएमची एन्ट्री झाल्यास राजकीय गणिते बदलू शकतात. नगरसेवकांचे थेट नगराध्यक्ष पदासाठी एमआयएम कडून उमेदवार मैदानात उतरवला जाण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत संगमनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक शरीफ शेख यांच्या पत्नीचे नाव चर्चेत आले आहे. शहरात मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या असल्याने एमआयएम पक्षाने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील तीन ते चार प्रभागांमध्ये एमआयएमचे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत.

या पार्श्वभूमीवर, संगमनेर येथील एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. तसेच, एमआयएमच्या सचिवांसोबतही संगमनेरच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. 

शहराध्यक्ष दानिश मिर्झा यांनी सांगितले की, या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात माजी खासदार इम्तियाज जलील संगमनेर येथेयेणार असून या संबंधीची अधिकृत घोषणा करतील. त्यानंतर मात्र राजकीय हालचाली वाढणार असून एमआयएम कडून नगरसेवकपदासाठी इच्छुकांची संख्या देखील वाढत असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडी कडून संधी न मिळाल्यास काहीजण बंडखोरी देखील करण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर पालिका निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

संगमनेरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने या पदासाठी महाविकास आघाडी, महायुतीकडून शहरात विविध नावांची चर्चा सुरू आहे. निवडणुकीतील मुस्लिम मतदारांचे प्राबल्य लक्षात घेता माजी नगरसेवक शरीफ शेख यांनीही आपल्या पत्नीसाठी नगराध्यक्षपदाकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. शरीफ शेख यांनी एमआयएम पक्षाकडून उमेदवारी केल्यास नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.


एमआयएमच्या बैठकीत मुलाखती आणि उमेदवारीबाबत चर्चा – २१ ऑक्टोबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएम पक्षाच्यावतीने आजी-माजी पदाधिकारी तसेच नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी संभाव्य उमेदवारांच्या मुलाखतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पश्चिम महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली या ठिकाणाहून जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीच्या निमित्ताने संगमनेर शहर आणि तालुक्याच्यावतीने सर्व पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांना घेऊन एक शिष्टमंडळ या बैठकीला हजर होते. नगराध्यक्ष पदासाठी शेख यांच्या पत्नीचे नाव पुढे आला असून त्यांची व नगरसेवक पदासाठी अमजद अब्बास पठाण यांची मुलाखत घेण्यात आली आहे. लवकरच संगमनेर शहरात एमआयएमचे कार्यालय संगमनेर येथे नगरपालिका, जिल्हा परिषद, आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत बैठक आयोजित केली जाईल. वेळ आणि दिवस ठरल्यानंतर सर्वांना कळवले जाईल, अशी माहिती उत्तर नगर जिल्हा समन्वयक इम्रानभाई देशमुख आणि संगमनेर शहर समन्वयक दानिश मिर्झा यांनी दिली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,180
एमआयएम दानिश मिर्झा नगरपरिषद निवडणूक संगमनेर नगरपरिषद निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.