Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘राहुल गांधी समर्थक संघ’ (RGSS) आक्रमक; डॉ. संपदा मुंडे हत्या प्रकरणात राजकीय दबाव झुगारून दोषींवर कारवाईची मागणी
सामाजिक

‘राहुल गांधी समर्थक संघ’ (RGSS) आक्रमक; डॉ. संपदा मुंडे हत्या प्रकरणात राजकीय दबाव झुगारून दोषींवर कारवाईची मागणी

या सर्व पार्श्वभूमीवर, भविष्यात कोणत्याही महिला अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर अशी गंभीर परिस्थिती ओढवू नये यासाठी पोलीस प्रशासनात आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्याबाबतचे आदेश त्वरित जारी करावेत, अशी मागणी 'राहुल गांधी समर्थक संघाने' केली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/10/2025Updated:29/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर – फलटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या कथित हत्या प्रकरणातील दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पोलीस अधिकारी आणि राजकीय व्यक्तींकडून होणारा दबाव व महिलांवरील अत्याचाराविरोधात प्रशासकीय सुधारणा करावी, अशा मागण्यांचे निवेदन ‘राहुल गांधी समर्थक संघ, महाराष्ट्र’ यांच्यावतीने काल (मंगळवार २८ ऑक्टोंबर) संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना देण्यात आले.
डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याच्यावर बलात्कार केल्याचा, तसेच प्रशांत बनकर व इतरांकडून शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागल्याचा गंभीर आरोप केलेला आहे. महिलांविरोधातील गुन्हे रोखण्याची आणि महिलांना कायदेशीर संरक्षण देण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांवरच असे गंभीर आरोप होणे, ही कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक बाब असल्याचे ‘राहुल गांधी समर्थक संघाने’ निवेदनात स्पष्ट केले आहे.
या प्रकरणातील आरोपींना संरक्षण देण्यासाठी माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर, त्यांचे स्वीय्य सहाय्यक राजेंद्र शिंदे, आणि रोहित नागतिळे यांनी दबाव टाकल्याची गंभीर बाबही ‘राहुल गांधी समर्थक संघाने’ निदर्शनास आणली आहे. पीडित डॉ. मुंडे यांच्या कुटुंबानेही या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप आणि दडपशाही होत असल्याचा गंभीर आरोप करत तातडीने न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, भविष्यात कोणत्याही महिला अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर अशी गंभीर परिस्थिती ओढवू नये यासाठी पोलीस प्रशासनात आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्याबाबतचे आदेश त्वरित जारी करावेत, अशी मागणी ‘राहुल गांधी समर्थक संघाने’ केली आहे. तसेच, सदर मागण्यांचे निवेदन अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्यामार्फत सातारा पोलीस आयुक्त यांच्यापर्यंत योग्य तो पत्रव्यवहार करून कळविण्यात यावे, अशी विनंतीही संघाने केली आहे.
हे निवेदन ‘राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र’च्या वतीने अमोल शेलकर, राम अरगडे, प्रकाश कडलग, सतीश खताळ, मोहसीन शेख, कल्याण जोर्वेकर, अरुण गावित्रे, अक्षय मोहिते, शंतनू भालेकर, अनिल राऊत, भरत कळसकर आदी कार्यकर्त्यांनी दिले आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 403
अमोल शेलकर डॉ संपदा मुंडे हत्या प्रकरण निवेदन राहुल गांधी समर्थक संघ संगमनेर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: समाजमाध्यमांच्या माध्यमातून खरेदी केलेल्या आणि नशेसह शारीरिक ताकदीसाठी बेकायदेशीरपणे…

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.