Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गांजा प्रकरणाचा ‘तो’ व्हिडिओ निघाला खोटा: आमदार खताळ समर्थकांकडून व्हायरल झालेला तो व्हिडिओ ‘फेक’ बनवल्याचा काँग्रेसचा आरोप! तरुण म्हणाले हा तर आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा डाव…
राजकारण

गांजा प्रकरणाचा ‘तो’ व्हिडिओ निघाला खोटा: आमदार खताळ समर्थकांकडून व्हायरल झालेला तो व्हिडिओ ‘फेक’ बनवल्याचा काँग्रेसचा आरोप! तरुण म्हणाले हा तर आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा डाव…

फेक' व्हिडिओमुळे युवकांना मनस्ताप; काँग्रेस आक्रमक, पोलीस तक्रारीची तयारी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/12/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 
संगमनेर तालुक्यात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या ‘अमली पदार्थ’ प्रकरणावरून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या प्रकरणावरून आमदार अमोल खताळ यांच्यावर काँग्रेसने अत्यंत गंभीर आरोप करत त्यांचे सभागृहातील वक्तव्य आणि सोशल मीडियावर प्रसारित झालेले व्हिडिओ ‘छेडछाड’ केलेले असल्याचा सनसनाटी दावा केला आहे. मूळ व्हिडिओ आणि फोटो पत्रकार परिषदेत सादर करत काँग्रेसच्या नेत्यांसह संबंधित युवकांनी या व्हिडिओची पोलखोल करत खताळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
नवीन लोकप्रतिनिधी आमदार खताळ समर्थकांकडून ‘खोटे व्हिडिओ बनवण्याचा उद्योग’ सुरू असून, यामुळे निष्पाप तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. हा उद्योग त्वरित बंद करा, अन्यथा तालुक्यातील तरुणाईच्या प्रचंड उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा संतप्त इशाराच व्हिडिओ बाधित युवकांनी दिला आहे.
खोट्या व्हिडिओचे पितळ उघडे! – यशोधन जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्यासह मूळ व्हिडिओतील युवक साईराज कांदळकर, सार्थक कांदळकर, आणि अक्षय दिघे उपस्थित होते.
नेमकं काय घडलं? – नागपूर अधिवेशनादरम्यान आमदार खताळ यांच्या यंत्रणेमार्फत काही व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये पसरवण्यात आले. यामध्ये जे युवक ‘गांजा तस्कर’ म्हणून दाखवण्यात आले, ते तळेगाव दिघे येथील आहेत. या युवकांनी नवीन ‘थार’ गाडी घेतल्यानंतर गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निकालानंतर तिच्या पूजनासाठी आणली होती. यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात, खासदार निलेश लंके, आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे उपस्थित होते.
युवकांनी पूजनाच्या वेळचे मूळ व्हिडिओ आणि फोटो पत्रकार परिषदेत सादर केले. खताळ यांच्या यंत्रणेने फिरवलेल्या व्हिडिओमध्ये ‘तुषार पडवळ’ नावाचा जो व्यक्ती दाखवला आहे, तो प्रत्यक्षात सार्थक कांदळकर असल्याचे उघड झाले आहे.
बहिणीच्या लग्नात पाहुण्यांनी विचारले, तू गांजा विकतोस का? – व्हिडिओमुळे झालेल्या मनस्तापाबद्दल बोलताना सार्थक कांदळकर याने तीव्र भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, माझ्या बहिणीचे लग्न होते आणि त्याच दिवशी हा व्हिडिओ बाहेर आला. लग्नासाठी आलेल्या नवीन पाहुण्यांनी थेट मला, ‘तू गांजाचा व्यवसाय करतो की काय?’ असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यामुळे माझ्या घरच्यांना आणि मला प्रचंड मनस्ताप झाला. हे माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र आहे.
साईराज कांदळकर यांनी सांगितले की, बाळासाहेब थोरात व आमच्या घरचे यांचे आमच्यावर चांगले संस्कार आहेत. आम्ही कधीही वाईट मार्गाला गेलो नाही. कष्टाने काम करतो. कृपया अशी खोटी बदनामी थांबवा.
खोटे बोलून तालुक्याची बदनामी करणे थांबवा – बाबा ओहोळ यांनी आमदार खताळ यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, संगमनेर तालुक्याला चांगल्या आणि सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. मात्र, नवीन आमदार खताळ खोट्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणीवपूर्वक तालुक्याची बदनामी करत आहेत. संधी मिळाली तर तुम्ही विकास कामे करा, निधी आणा, पण खोट्या गोष्टी दाखवून बदनामी करू नका, अन्यथा तालुका तुम्हाला माफ करणार नाही.
अजय फटांगरे यांनीही खोट्या फोटो आणि व्हिडिओमुळे होणारी तालुक्याची बदनामी तालुक्यातील युवक कधीही सहन करणार नाही, असा इशारा दिला.
बदनामीविरोधात पोलीस तक्रारीची तयारी – या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन, सोशल मीडियावर झालेल्या बदनामीच्या विरोधात सर्व बाधित युवकांनी पोलीस तक्रार दाखल करणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, पत्रकार परिषदेनंतर तुषार पडवळ नावाचा उल्लेख असलेला कार्यकर्ता हा अमोल खताळ यांचाच कार्यकर्ता असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट झाल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी एका फोटोच्या माध्यमातून केला आहे.

📌 थोरात-संगमनेरच्या बदनामीचा राज्यातून निषेध!
राज्यातील मोठ्या नेत्यांच्या सभोवती कायम तरुण कार्यकर्त्यांचा गराडा असतो. राजकीय नेते कार्यकर्त्यांना सहसा नाराज करत नाहीत. मात्र, चुकीचे फोटो दाखवून संगमनेरचे आमदार खताळ यांनी केलेली संगमनेरची बदनामी राज्य सहन करणार नाही. तसेच, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या आणि संगमनेर तालुक्याबद्दल टिपणी करणाऱ्या प्रवृत्तीचा राज्यभरातून निषेध होत असल्याचे बाबा ओहोळ यांनी यावेळी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,064
अमोल खताळ गांजा प्रकरण फेक व्हिडिओ सोशल मीडिया बदनामी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आर्थिक

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडियावरील रिल्स, भ्रामक ट्रेंड आणि ऑनलाइन चर्चांच्या…

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.