Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एमआयडीसीसाठी उपलब्ध जागेचा अहवाल सादर करण्याचे आदेश, आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश – पठारातील प्रस्तावित एमआयडीसीसाठी ‘गुड न्यूज’
विकास

एमआयडीसीसाठी उपलब्ध जागेचा अहवाल सादर करण्याचे आदेश, आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश – पठारातील प्रस्तावित एमआयडीसीसाठी ‘गुड न्यूज’

यापूर्वी पाणी व मनुष्यबळाच्या अडचणींमुळे संगमनेरमध्ये दुसरी औद्योगिक वसाहत शक्य नव्हती. मात्र आता साकुर व बोटा भागात आवश्यक सुविधा उपलब्ध होऊ शकतात.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/12/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज: 

संगमनेर तालुक्यात नवीन औद्योगिक वसाहत (MIDC) स्थापन करण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला सकारात्मक दिशा मिळताना दिसत आहे. पठार भागातील साकुर व बोटा परिसरात औद्योगिक वसाहत उभारण्याच्या दृष्टीने या भागातील दहा ते पंधरा किलोमीटरच्या परिघात शासकीय अथवा खाजगी स्वरूपातील औद्योगिक वापरासाठी उपलब्ध होऊ शकणाऱ्या जागांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश मंडल अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

आमदार सत्यजीत तांबे यांनी 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर तालुक्याच्या पठार भागात औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर 7 एप्रिल 2025 रोजी त्यांनी उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांना यासंदर्भात पत्र पाठवले. त्या पत्राची दखल घेत उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

या अनुषंगाने एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड यांनी 26 सप्टेंबर व 13 नोव्हेंबर 2025 रोजी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार संगमनेर यांना जागेच्या उपलब्धतेबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तहसीलदार संगमनेर यांनी मंडल अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

संगमनेरमध्ये यापूर्वीच सहकारी तत्त्वावर औद्योगिक वसाहत कार्यरत आहे. साकुर–बोटा भागात शासकीय एमआयडीसीला मान्यता मिळाल्यास परिसरात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते. संगमनेरची सहकारी औद्योगिक वसाहत 1980 पासून सुरू असून, सन 2002 मध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तिचे विस्तारीकरण करून सुमारे 100 एकर जागा उपलब्ध करून दिली होती. सध्या या वसाहतीत 186 उद्योग कार्यरत असून 262 प्लॉट आणि 26 व्यापारी गाळे वितरित करण्यात आले आहेत. या वसाहतीमुळे पाच हजारांहून अधिक कामगारांना रोजगार मिळत असून वार्षिक सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होतो.

मंडल अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना- पठार भागात औद्योगिक वसाहतीसाठी कोणत्या शासकीय व खाजगी जमिनी उपलब्ध आहेत, तसेच कोणत्या जागा हस्तांतरित करता येऊ शकतात, याबाबत साकुर व घारगाव मंडल अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 1 डिसेंबर 2025 रोजी तहसीलदार संगमनेर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. दरम्यान याच प्रकरणी 3 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही तहसीलदार संगमनेर यांना सदर एमआयडीसी बाबतीत जागच्या उपलब्धते बाबतीत अहवाल तात्काळ प्रादेशिक अधिकारी (एमआयडीसी) अहिल्यानगर यांना पाठविण्याच्या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहे.

एमआयडीसीकडून प्रस्ताव सादर करण्याची तयारी- साकुर व बोटा परिसरात पाणी, जमीन, मनुष्यबळ व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध असल्याने स्थानिक प्रशासनाकडून अहवाल घेऊन शासनाकडे नवीन औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.


एमआयडीसी हेच उद्दिष्ट- यापूर्वी पाणी व मनुष्यबळाच्या अडचणींमुळे संगमनेरमध्ये दुसरी औद्योगिक वसाहत शक्य नव्हती. मात्र आता साकुर व बोटा भागात आवश्यक सुविधा उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे येथे एमआयडीसी सुरू व्हावी यासाठी माझा पाठपुरावा सुरूच राहील. सर्व स्तरावर प्रयत्न झाले तर संगमनेरमध्ये नक्कीच नवीन औद्योगिक वसाहत उभी राहील, असा विश्वास आहे.”-सत्यजित तांबे, आमदार.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,639
औद्योगिक वसाहत पठार भाग सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.