Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जवळेकडलगमध्ये आत्तापर्यंत तीन बिबटे जेरबंद, चिमुकल्या सिद्धेशच्या मृत्यूनंतर वनविभाग ॲक्शन मोडमध्ये! काळजाचा ठोका चुकवणारी मोहीम, ‘डॉट’ मारून एकाला पकडले तर दुसरा पिंजऱ्यात जेरबंद
महाराष्ट्र संवाद विशेष

जवळेकडलगमध्ये आत्तापर्यंत तीन बिबटे जेरबंद, चिमुकल्या सिद्धेशच्या मृत्यूनंतर वनविभाग ॲक्शन मोडमध्ये! काळजाचा ठोका चुकवणारी मोहीम, ‘डॉट’ मारून एकाला पकडले तर दुसरा पिंजऱ्यात जेरबंद

वनविभागाच्या रेस्क्यू टीमने अत्यंत धाडसी मोहीम राबवत आतापर्यंत तीन बिबट्यांना जेरबंद केले.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 19, 2025Updated:December 20, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग परिसरात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली बिबट्याची दहशत कमी करण्यासाठी वनविभागाला मोठे यश आले आहे. वनविभागाच्या रेस्क्यू टीमने अत्यंत धाडसी मोहीम राबवत आतापर्यंत तीन बिबट्यांना जेरबंद केले. सुरुवातीला घटनेच्या दुसऱ्या दिवशी पकडण्यात आलेल्या बिबट्यानंतर पुन्हा एका बिबट्याला गुंगीचे औषध (डॉट) देऊन पकडण्यात आले, तर एक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे पकडलेल्या बिबट्यांची संख्या जवळेकडल मध्ये तीन वर गेली आहे.

काही दिवसांपूर्वी जवळेकडलग येथील अवघ्या चार वर्षांच्या सिद्धेश कडलग या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते. शासनाने या घटनेची गंभीर दखल घेत नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले होते. मात्र, वनविभागाच्या रेस्क्यू टीमने तंत्रज्ञानाचा आणि कौशल्याचा वापर करून बिबट्याला जिवंत पकडण्यात यश मिळवले.

गेल्या काही दिवसांपासून वनविभागाचे पथक या भागात तळ ठोकून होते. शुक्रवारी राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेत रेस्क्यू टीमला एक बिबट्या दिसून आला, त्याला तातडीने ‘डॉट’ मारून बेशुद्ध करण्यात आले. त्याचवेळी परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात दुसरा बिबट्या अडकल्याचे समोर आले. पकडण्यात आलेले दोन्ही बिबटे मादी जातीचे असून त्यांचे वय अंदाजे दीड ते दोन वर्ष आहे.

ही मोहीम नाशिकचे सहाय्यक वनसंरक्षक अमरजीत पवार, वनक्षेत्रपाल सागर केदार यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने फत्ते केली. आतापर्यंत तीन बिबटे जेरबंद झाल्याने जवळेकडलग परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असला, तरी परिसरात अजूनही इतर बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता असल्याने वनविभागाने शोध मोहीम सुरूच ठेवली आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 872
बिबट्या बिबट्या हल्ला वनविभाग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

मान्सून खोळंबला; किमान १५ जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक पावसाची शक्यता धूसर, शेतकऱ्यांना घाई न करण्याचे आवाहन

June 7, 2026

संगमनेर नगरपरिषदेचा दणका: भाजप नेत्याच्या मुलाविरुद्ध अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश

June 6, 2026

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJune 9, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर: एकीकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) धडक आयुक्त तुकाराम…

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मोठा झटका; अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या ९ वरून थेट ४ वर

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.