Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरचा मोठा निर्णय! विजयाचा गुलाल तर उडाला, पण ‘हे’ पाहून सर्वच अवाक…
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरचा मोठा निर्णय! विजयाचा गुलाल तर उडाला, पण ‘हे’ पाहून सर्वच अवाक…

आमदार सत्यजित तांबे यांनी करून दाखवलं! दिलेला शब्द पाळला, संगमनेरमध्ये घडलं असं काही की...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज- 

राजकारणात विजय मिळाला की गुलालाची उधळण आणि गल्लोगल्ली फ्लेक्स लावून शक्तिप्रदर्शन करण्याची परंपरा आहे. मात्र, संगमनेरमध्ये या परंपरेला छेद देत एक नवा आदर्श निर्माण करण्यात आला आहे. माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी दिलेल्या सूचनेचे तंतोतंत पालन करत, सेवा समितीने ऐतिहासिक विजयानंतरही एकही फ्लेक्स न लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहरातील बसस्थानक परिसर आणि मुख्य रस्त्यांनी अक्षरशः ‘मोकळा श्वास’ घेतला असून, केवळ फ्लेक्सबाजी करणाऱ्या पुढाऱ्यांना ही मोठी चपराक मानली जात आहे.

शब्दाला जागले आमदार!- निवडणूक प्रचारादरम्यान आमदार सत्यजित तांबे यांनी शहराचे विद्रूपीकरण थांबवण्याचे आश्वासन दिले होते. केवळ आश्वासनच दिले नाही, तर दिवाळीपूर्वी त्यांनी स्वतःचे फ्लेक्स स्वतः काढून एक आदर्श घालून दिला होता. संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे आणि २७ नगरसेवकांनी राज्यात अव्वल ठरेल असा विक्रमी विजय मिळवला. इतका मोठा विजय मिळाल्यानंतरही शहरात कुठेही फ्लेक्सबाजी न करता सेवा समितीने आपले पहिले वचन पूर्ण केले आहे.

फ्लेक्सबाज पुढाऱ्यांचे ‘दुकान’ बंद!- मागील वर्षभरात संगमनेर शहरात, विशेषतः हायटेक बसस्थानक परिसरात फ्लेक्समुळे मोठ्या प्रमाणावर विद्रूपीकरण झाले होते. ज्यांचे समाजकार्यात शून्य योगदान आहे, अशा काही ‘फ्लेक्सबाज’ पुढाऱ्यांनी शहरात बॅनरची चढाओढ लावली होती. सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले होते. 

याबाबत संगमनेरमधील अनेक समाजसेवी संघटना, बस स्थानकावरील गाळेधारक, युवक संघटना यांनीही वेळोवेळी आंदोलने केली मात्र सत्ताधाऱ्यांनी दमदाटी करून फ्लेक्स तसेच ठेवले. अगदी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कमानीवरही मुद्दाम फ्लेक्स लावून संगमनेरकरांच्या भावना दुखावण्याचे काम झाले होते. मात्र, आमदार तांबे यांनी प्रशासनाला अनधिकृत फ्लेक्सवर कारवाईच्या सूचना देताच या हौशी पुढाऱ्यांना मोठी चपराक बसली आहे.

नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव- कोणतेही विकासकाम न करता केवळ फ्लेक्सवर चमकणाऱ्या नेत्यांना जनतेने नाकारले आहे. शहरातील अनेक युवक आणि समाजसेवी संस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. “काम बोलतं, फ्लेक्स नाही,” अशा प्रतिक्रिया आता संगमनेरमधून उमटत आहेत.


कोणतेही विकास काम न करता फक्त फ्लेक्स बाजी करणे किंवा कोणत्याही समाजकार्यात योगदान न देता सामाजिक कार्यकर्ता म्हणून फ्लेक्स लावणे हा मोठा उद्योग संगमनेरमध्ये सुरू झाला होता. अनेक भाऊ, दादांसोबत गल्लीत, घरात योगदान नसलेले अनेक फ्लेक्स स्वयंघोषित पुढारी रस्त्यावर फ्लेक्सच्या रूपाने अवतरल्याचे दिसत होते. शहरातील प्रमुख रस्त्यांवर या फ्लेक्स पुढाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. एकमेकांच्या फ्लेक्स वर फ्लेक्स लावण्याची मोठी चढाओढ देखील बघावयास मिळत होती. यावर आमदार सत्यजित तांबे यांनी अनधिकृत कोणाचाही फ्लेक्स लागणार नाही अशी सूचना प्रशासनाला केली. यामुळे अशा फ्लेक्सबाज पुढार्‍यांना मोठी चपराक मिळाली आहे. आता हे चित्र कायमस्वरूपी राहो! अशी अपेक्षा सुज्ञ संगमनेरकर व्यक्त करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,834
अनधिकृत फ्लेक्स निवडणूक संगमनेर सेवा समिती सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.