Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

07/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार अमोल खताळ यांची माहिती: मतदारसंघासाठी महायुती सरकारकडून एका वर्षातच ८४९ कोटीचा विक्रमी निधी! रस्ते, आरोग्य आणि सिंचनासह जनसामान्यांच्या प्रश्नांना गती
राजकारण

आमदार अमोल खताळ यांची माहिती: मतदारसंघासाठी महायुती सरकारकडून एका वर्षातच ८४९ कोटीचा विक्रमी निधी! रस्ते, आरोग्य आणि सिंचनासह जनसामान्यांच्या प्रश्नांना गती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने गेल्या अवघ्या एका वर्षात तब्बल ८४८ कोटी ९७ लाख रुपयांचा भरघोस निधी खेचून आणण्यात आ. खताळ यांना यश आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/01/2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 

संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार अमोल खताळ यांनी मांडलेला विकासाचा ‘धडाका’ आता कोट्यावधी रुपयांच्या दाव्यात रूपांतरित झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने गेल्या अवघ्या एका वर्षात तब्बल ८४८ कोटी ९७ लाख रुपयांचा भरघोस निधी खेचून आणण्यात आ. खताळ यांना यश आले आहे. यामुळे मतदारसंघातील प्रलंबित कामांना मोठी गती मिळाली आहे.

ग्रामीण विकासाचा कणा असलेले रस्ते मजबूत करण्यासाठी आ. खताळ यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ४५ कोटी तर जिल्हा वार्षिक योजनेतून १६ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यामुळे पावसाळ्यात तुटणारा गावांचा संपर्क आणि दुर्गम भागातील रस्त्यांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. तसेच शहरांतर्गत रस्ते आणि ड्रेनेज व्यवस्थेसाठी २५ कोटींची तरतूद करत नागरी सुविधांनाही प्राधान्य दिले आहे.

आरोग्य आणि सिंचनाचे मोठे प्रकल्प- तालुक्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर आणि स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय उभारण्यासाठी आ. खताळ यांचा पाठपुरावा अंतिम टप्प्यात आहे. शेतीसाठी संजीवनी ठरणाऱ्या साकूर पठार भागातील उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण सुरू झाले असून, भोजापूर डावा कालवा व पूरचारी दुरुस्तीसाठी ४४ कोटी ४६ लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत. निळवंडे कालव्यांच्या कामांसाठीही ११० कोटी ९८ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.

औद्योगिक क्रांती आणि रोजगार– संगमनेरच्या औद्योगिक प्रगतीसाठी एमआयडीसी मंजूर करून घेण्यात आ. खताळ यांना यश मिळाले असून कवठे मलकापूर येथील जागेचा प्रस्ताव सादर झाला आहे. यामुळे स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागणार आहे. याशिवाय, बांधकाम कामगारांना ४ कोटी ५९ लाखांचे लाभ आणि गृहपयोगी वस्तूंचे वाटप करून त्यांनी कष्टकऱ्यांना मोठा आधार दिला आहे.

सामान्यांच्या प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज- तुकडाबंदी कायदा, अतिक्रमित जागांच्या नोंदी, वक्फ बोर्डाचे दावे आणि स्वस्त धान्य दुकानांतील तांत्रिक अडचणींबाबत आ. खताळ यांनी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली. अवैध कत्तलखाने आणि अमली पदार्थ विक्री विरोधातही त्यांनी कठोर कारवाईची मागणी करत गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. तसेच पुणे-नाशिक रेल्वे ही संगमनेर मार्गेच जावी, यासाठी आग्रही भूमिका घेत आमदार खताळ यांनी जनतेसोबत राहण्याचा निर्धार केला आहे.

कोणत्याही पीए किंवा पुढाऱ्याच्या शिफारशीशिवाय आ. अमोल खताळ हे थेट जनतेला भेटतात. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या लोकप्रतिनिधीने वर्षभरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी आणल्याने संगमनेरच्या राजकारणात विकासाला गती मिळाल्याचे सांगितले जाते.

वर्षभरातील विकासकामांचा निधी दृष्टिक्षेपात:

  • बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत – २ कोटी १५ लाख
  • स्मार्ट अंगणवाडी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत – १ कोटी ३३ लाख
  • मनरेगा अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना – २१ कोटी ४० लाख
  • भोजापूर डावा कालवा व पुर चारी दुरुस्ती व नूतनीकरण काम – ४४ कोटी ४६ लाख
  • महाराष्ट्र शासन कृषी विभाग योजना अंतर्गत लाभार्थ्यांना – १०१ कोटी ४१ लाख
  • तालुक्यातील ४४ हजार १७० अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत – ३१ कोटी ७१ लाख
  • उर्ध्व प्रवरा प्रकल्प निळवंडे धरण डावा आणि उजवा कालवा कामासाठी – ११० कोटी ९८ लाख
  • मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत अटल भूजल योजना व जलयुक्त शिवार गाळमुक्त धरण – ८ कोटी ३४ लाख
  • संगमनेर शहरातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था परीक्षेत्र अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा व सुविधा रस्ते विकास योजना – १६ कोटी ३ लाख ४० हजार १५०
  • महावितरण सौर कृषी योजना, नवीन उपकेंद्र, वीज रोहित्र व वीज वाहिनी – १७ कोटी १७ लाख
  • आमदार स्थानिक विकास कार्यक्रम – ६ कोटी ९० लाख
  • मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत – ४५ कोटी
  • पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत – २५ लाख
  • ग्रामपंचायतींना जन सुविधांसाठी विशेष अनुदान योजना – ३ कोटी ९० लाख
  • जिल्हा नियोजन – ४ कोटी ८५ लाख
  • जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ३०५४ अंतर्गत ग्रामीण विकास – १६ कोटी ८५ लाख
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत – २ कोटी
  • वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत – १ कोटी १९ लाख
  • ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजना अंतर्गत – १ कोटी ९ लाख
  • नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान – २ कोटी १० लाख
  • प्रादेशिक पर्यटन विकास योजना – १ कोटी ८० लाख
  • व्यायामशाळा विकास अनुदान योजना – १ कोटी ५ लाख
  • संगमनेर पंचायत समिती अंतर्गत विविध योजना लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना – २८५ कोटी ४१ लाख
  • आदिवासी विभाग अंतर्गत ठक्कर बाप्पा योजना – ४ कोटी १० लाख
  • डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड – १ कोटी ८९ लाख
  • संगमनेर शहर आणि तालुक्यात हायमास्ट बसविण्यासाठी – ६ कोटी ५४ लाख

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 358
अमोल खताळ निधी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथे प्रस्तावित असलेल्या वादग्रस्त औद्योगिक…

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

07/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.