Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

July 18, 2026

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

आज, शनिवार १८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 18, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दुर्गाताईनंतर डॉ. मैथिलीताई पर्व सुरू! संगमनेरच्या विकासासाठी ‘संगमनेर २.०’ संकल्पनेचा श्री गणेशा; नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांचा निर्धार
राजकारण

दुर्गाताईनंतर डॉ. मैथिलीताई पर्व सुरू! संगमनेरच्या विकासासाठी ‘संगमनेर २.०’ संकल्पनेचा श्री गणेशा; नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांचा निर्धार

संगमनेरच्या सुनेला तुम्ही मुलीसारखे प्रेम देऊन या ऐतिहासिक शहराचा प्रथम नागरिक केले आहे, त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 3, 2026Updated:January 3, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 
स्त्री स्वतःचे आणि समाजाचे भविष्य घडवते, या विचारांना स्मरून मी संगमनेरच्या सेवेसाठी सज्ज आहे, असे भावनिक उद्गार संगमनेरच्या नवनियुक्त नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी काढले. संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
प्रियदर्शनी इंदिरा गांधी भवनांमध्ये संगमनेर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिली सत्यजित तांबे यांनी नगराध्यक्ष खुर्चीवर बसून आपला पदभार स्वीकारला. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी, मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, जर्मनीच्या माजी खासदार क्लोडिया नॉलटे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आदी उपस्थित होते.
तांबे म्हणाल्या, संगमनेरकरांनी दिलेला विश्वास ही माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे. मी येथे केवळ एक व्यक्ती म्हणून नाही, तर संगमनेरमधील प्रत्येक कुटुंबाची प्रतिनिधी म्हणून उभी आहे. संगमनेरच्या सुनेला तुम्ही मुलीसारखे प्रेम देऊन या ऐतिहासिक शहराचा प्रथम नागरिक केले आहे, त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे, असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, हे पद केवळ मान-सन्मान नसून जनतेची सेवा करण्याची एक मोठी संधी आहे.
संगमनेर नगरपालिकेचे ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीदवाक्य सत्यात उतरवण्यासाठी आपली संपूर्ण टीम कटिबद्ध असेल, असे आश्वासन त्यांनी दिले. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाची अडचण ही स्वतःची समजून सोडवण्यावर त्यांचा भर राहणार आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी ‘संगमनेर २.०’ ही संकल्पना मांडली. लोकनेते बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विकासाची संकल्पना प्रत्यक्ष अमलात आणली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपल्या भाषणाची सुरुवात आणि शेवट करताना त्यांनी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मदर तेरेसा, रमाबाई आंबेडकर आणि फातिमा शेख यांसारख्या थोर व्यक्तिमत्त्वांना अभिवादन करून स्त्रीशक्तीचा गौरव केला.
या कार्यक्रमाला संगमनेरमधील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी डॉ. मैथिली तांबे यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,445
नगराध्यक्ष पदग्रहण बाळासाहेब थोरात मैथिली तांबे सत्यजित तांबे सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026

‘दुर्गाताई, आता आत्मपरीक्षणाची गरज; लाभार्थ्यांना बाजूला करा!, ताईंवर चिखलफेक होत असताना काँग्रेसचे २८ नगरसेवक गप्प का? – शिवसेनेचे अमर कतारी यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
यश / निवड / पुरस्कार

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

By अनंत पांगारकरJuly 18, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत संगमनेर तालुका…

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

आज, शनिवार १८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 18, 2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

July 17, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.