Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थेट फोन करा, आपल्यात कोणताही ‘पीए’ येणार नाही; संगमनेरात विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदेंचा कार्यकर्त्यांना मोठा शब्द
राजकारण

थेट फोन करा, आपल्यात कोणताही ‘पीए’ येणार नाही; संगमनेरात विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदेंचा कार्यकर्त्यांना मोठा शब्द

हल्ली कार्यकर्ते सभापतींचा फोनही उचलत नाहीत, असा मिश्किल टोला लगावत त्यांनी जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना मोठा आधार दिला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, प्रतिनिधी – 
तुम्ही मला कधीही फोन किंवा मेसेज करा, मी स्वतः त्याला उत्तर देईन. माझ्या आणि तुमच्या संवादामध्ये कोणताही पीए (खाजगी सचिव) येणार नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी संगमनेरमधील भाजप कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. हल्ली कार्यकर्ते सभापतींचा फोनही उचलत नाहीत, असा मिश्किल टोला लगावत त्यांनी जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना मोठा आधार दिला.
सोमवारी पुण्याहून कोपरगावला एका सोहळ्यासाठी जात असताना प्रा. शिंदे यांनी संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहात थांबून भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील शंका दूर करत त्यांना सक्रिय होण्याचे आवाहन केले.
सभापती असलो तरी आधी कार्यकर्ताच- निवडणुकीतील पराभवानंतरही पक्षाने कामाची दखल घेऊन सभापती पद दिले, हे नमूद करत शिंदे म्हणाले की, मी आज मोठ्या पदावर असलो तरी मुळात मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. माझ्या कार्यालयाची दारे कार्यकर्त्यांसाठी २४ तास उघडी आहेत. सत्तेच्या काळात कार्यकर्त्यांना डावलले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
जुन्या कार्यकर्त्यांची ‘खदखद’ आणि शिंदेंचे आश्वासन- यावेळी भाजप नेते जालिंदर वाकचौरे यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील भावना मांडल्या. संघर्षाच्या काळात पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना सत्तेत योग्य मानसन्मान मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. यावर भाष्य करताना राम शिंदे म्हणाले की, पक्षाचा डोलारा हा निष्ठावान कार्यकर्त्यांवरच उभा असतो. जुन्या कार्यकर्त्यांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
जनसामान्यांची कामे करा- राज्यात आणि देशात भाजपचे सरकार असल्याने कार्यकर्त्यांनी या ताकदीचा वापर जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. या बैठकीमुळे संगमनेर भाजपमध्ये नवा उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले.
या बैठकीला जालिंदर वाकचौरे, भरत फटांगरे, दीपक भगत, ज्ञानेश्वर कर्पे, वैभव लांडगे, पायल ताजणे, विठ्ठल शिंदे, काशिनाथ पावसे, राजेंद्र सांगळे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,011
राम शिंदे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: आगामी गणेशोत्सव भव्य, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार…

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.