Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कल्याणच्या ‘कुरेशी’ कुटुंबाचा संगमनेरमध्ये गंडा; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

कल्याणच्या ‘कुरेशी’ कुटुंबाचा संगमनेरमध्ये गंडा; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल

मागचे पैसे आम्ही थोडे थोडे करून देऊन टाकू, तुम्ही पुन्हा आमच्याशी व्यवहार सुरू करा, असे सांगून त्यांनी शेख यांचा विश्वास संपादन केला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/01/2026Updated:06/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर – 
विश्वासाचा फायदा घेऊन जनावरे खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे न देता एका व्यापाऱ्याची ३ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार संगमनेरमध्ये उघड झाला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जुनेद अहमद कुरेशी, यासीन अहमद कुरेशी आणि अहमद अब्बास कुरेशी (सर्व रा. कळंब, ता. मुरबाड, जि. कल्याण) या तिघांविरुद्ध फसवणूक व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी जब्बार हसन शेख (वय ५०, रा. अलकानगर, संगमनेर) हे ग्रामीण भागातून शेळ्या-मेंढ्या खरेदी करून विक्री करण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या ओळखीचा व्यापारी जुनेद अहमद कुरेशी याने १ ऑगस्ट २०२४ रोजी शेख यांच्या शेडवर येऊन २ लाख रुपयांची जनावरे खरेदी केली. जुन्या ओळखीमुळे शेख यांनी हा माल उधारीवर दिला. मात्र, वारंवार पैसे मागूनही जुनेदने टाळाटाळ केली आणि शेवटी ‘पैसे देणार नाही’ असे म्हणत उद्धटपणाची भाषा वापरली.
काही दिवसांनी जुनेदचा भाऊ यासीन अहमद कुरेशी आणि वडील अहमद अब्बास कुरेशी हे फिर्यादीच्या घरी आले. मागचे पैसे आम्ही थोडे थोडे करून देऊन टाकू, तुम्ही पुन्हा आमच्याशी व्यवहार सुरू करा, असे सांगून त्यांनी शेख यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या सांगण्यावरून १४ सप्टेंबर २०२४ रोजी शेख यांनी अन्य शेतकऱ्यांकडून घेतलेली १ लाख ४१ हजार रुपयांची जनावरे त्यांच्या गाडीत (MH 10 CR 5356) भरून दिली.
दोन दिवसात पैसे देण्याचे कबूल करूनही जुनेद अहमद कुरेशी, यासीन अहमद कुरेशी आणि अहमद अब्बास कुरेशी यांनी पैसे दिले नाहीत. फिर्यादीने जेव्हा पैशांसाठी तगादा लावला, तेव्हा या तिघांनीही फिर्यादीला आई-बहिणीवरून अर्वाच्य शिवीगाळ करत जास्त त्रास देऊ नको, नाहीतर तिथे येऊन तुला पाहून घेऊ, अशी जीवे मारण्याची धमकी दिली.
अखेर ३ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर जब्बार शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी जुनेद अहमद कुरेशी, यासीन अहमद कुरेशी आणि अहमद अब्बास कुरेशी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१८(४), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,331
गुन्हेगारी फसवणूक व्यापारी फसवणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.