Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे यांची ‘नवी टीम’ सज्ज; दिपाली पंचारियांकडे गटनेतेपदाची सूत्रे! उपनेत्यासह यांचीही केली निवड
राजकारण

नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे यांची ‘नवी टीम’ सज्ज; दिपाली पंचारियांकडे गटनेतेपदाची सूत्रे! उपनेत्यासह यांचीही केली निवड

उपगटनेतेपदाची महत्त्वाची जबाबदारी नगरसेवक सौरभ विवेक कासार यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर, सेक्रेटरीपदी लाला मुजीब खान आणि खजिनदारपदी भारत बोऱ्हाडे यांची वर्णी लागली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/01/2026Updated:08/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 
संगमनेरच्या स्थानिक राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे यांनी 2.0 च्या माध्यमातून आगामी काळातील विकासाचे रणशिंग फुंकले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगरपालिकेच्या नव्या कारभाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अधिकृत प्रक्रियेत नगरसेविका दिपाली पंचारिया यांची संगमनेर नगरपालिका गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. 

आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगर परिषदेमध्ये ‘संगमनेर सेवा समिती’ने मोठे यश मिळविले आहे. 30 पैकी तब्बल 27 नगरसेवक सेवा समितीचे निवडून आले आहे. तर महायुतीची केवळ एकमेव महिला विजयी झाले आहे. उर्वरित दोन अपक्ष उमेदवार सेवा समितीचे मानले जातात. या पार्श्वभूमीवर गुरुवारी अहिल्या नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर संगमनेर सेवा समितीच्या नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करण्यात आली.

जिल्हा प्रशासनाच्या साक्षीने पार पडलेल्या या निवडीमध्ये केवळ गटनेतेपदच नव्हे, तर नगरपालिकेच्या सत्तेचा समतोल राखण्यासाठी एका सक्षम फळीची बांधणी करण्यात आली आहे. उपगटनेतेपदाची महत्त्वाची जबाबदारी नगरसेवक सौरभ विवेक कासार यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर, सेक्रेटरीपदी लाला मुजीब खान आणि खजिनदारपदी भारत बोऱ्हाडे यांची वर्णी लागली आहे. या निवडीमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात, कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या निवडीने संगमनेरच्या सत्तेची नवी समीकरणे आता स्पष्ट झाली आहेत. या नव्या निवडीमुळे संगमनेर शहरात समर्थक कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. 

नव्या टीमच्या माध्यमातून पालिकेच्या कामकाजात आता नवी गती येणार असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ही ‘मैथिलीताई तांबे टीम’ आता अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे.

आपल्या निवडीनंतर नव्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, पक्षाने आणि नेतृत्वाने टाकलेला हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ही निवड केवळ एका पदाची नसून ती संगमनेरच्या जनतेच्या सेवेची नवी संधी आहे. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन, संघभावनेने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट घेऊ, असा ठाम निर्धार व्यक्त केला.

या निवडीच्या वेळी संगमनेरचे सर्व नगरसेवक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकीय विश्लेषकांच्या मते, या नवीन टीमच्या माध्यमातून नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे यांनी विरोधकांना मोठा शह दिला असून, विकासाच्या मुद्द्यावर आता संगमनेर नगरपालिका अधिक प्रभावीपणे काम करताना दिसेल. सामाजिक, व्यापारी आणि राजकीय स्तरावरून या नूतन पदाधिकाऱ्यांवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत असून, राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी होणाऱ्या नगराध्यक्षांमध्ये मैथिलीताई तांबे यांचा सर्वात वरचा क्रमांक लागत असल्याने आगामी काळात ही नवी टीम संगमनेरच्या विकासाची कोणती नवी शिखरे सर करते, याकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,439
गट नोंदणी जिल्हाधिकारी मैथिली तांबे संगमनेर सेवा समिती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: आगामी गणेशोत्सव भव्य, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार…

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.