Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द विद्युतीकरण! माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या कामाचे श्रेय घेण्याचा नवीन लोकप्रतिनिधींचा प्रयत्न, संगमनेर खुर्दचे उपसरपंच गणेश शिंदेंनी दिली पुराव्यासह सडेतोड उत्तरं…
राजकारण

रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द विद्युतीकरण! माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या कामाचे श्रेय घेण्याचा नवीन लोकप्रतिनिधींचा प्रयत्न, संगमनेर खुर्दचे उपसरपंच गणेश शिंदेंनी दिली पुराव्यासह सडेतोड उत्तरं…

७ फेब्रुवारी २०२३ रोजीच या कामासाठी २ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असताना, नवीन लोकप्रतिनिधी मात्र खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत, असा घणाघाती आरोप संगमनेर खुर्दचे उपसरपंच गणेश शिंदे यांनी केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/01/2026Updated:18/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द या रस्त्याच्या चौपदरीकरणासह विद्युतीकरण आणि पादचारी मार्गाचे काम माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मंजूर झाले आहे. ७ फेब्रुवारी २०२३ रोजीच या कामासाठी २ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असताना, नवीन लोकप्रतिनिधी मात्र खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत, असा घणाघाती आरोप संगमनेर खुर्दचे उपसरपंच गणेश शिंदे यांनी केला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गणेश शिंदे यांनी म्हटले आहे की, संगमनेर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी ९ किलोमीटरचा बायपास आणि इंजिनिअरिंग कॉलेज ते रायतेवाडी फाटा या ‘हॅपी हायवे’चे काम मंजूर करून घेतले. यातील बस स्थानकापर्यंतचे आणि रायतेवाडी फाटा ते प्रवरा नदीपर्यंतचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर पथदिवे, हाय मॅक्स दिवे आणि पादचारी मार्गासाठी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे पाठपुरावा करून थोरात यांनी निधी मंजूर करून घेतला होता.

विद्युतीकरणाच्या या कामाची निविदा कार्यकारी अभियंता (विद्युत विभाग) यांच्यामार्फत ६ मार्च २०२४ रोजी उघडण्यात आली असून १३ मार्च २०२४ रोजी हे काम संबंधित ठेकेदाराला सोपवण्यात आले आहे. याबाबतचे अधिकृत पत्र ग्रामपंचायतीलाही प्राप्त झाले आहे. संगमनेर खुर्द ग्रामपंचायतीने या कामासाठी थोरात साहेबांकडे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रीतसर मागणी केली होती, ही वस्तुस्थिती असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

असे असताना केवळ राज्यात आपले सरकार आहे म्हणून माहितीचा विपर्यास करून नवीन लोकप्रतिनिधी या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप तालुक्यासाठी एक रुपयाचाही नवीन निधी त्यांना आणता आलेला नाही. आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम त्यांनी थांबवावे. जनतेने त्यांना यापूर्वीच धडा शिकवला असून, यापुढे अशा प्रकारे दिशाभूल केल्यास त्यांना गावबंदी करण्यात येईल, असा इशाराही गणेश शिंदे व ग्रामस्थांनी दिला आहे.

निधी आणा आणि मग श्रेय घ्या; ग्रामस्थांचा संताप – महायुती सरकारच्या काळात तिजोरीत खडखडाट असून नवीन कामांना निधी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. सध्या सुरू असलेली सर्व कामे बाळासाहेब थोरात यांनीच मंजूर केलेली आहेत. कोणत्याही कामात योगदान नसताना केवळ पत्रकबाजी करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न नवीन लोकप्रतिनिधींनी करू नये, अशी संतप्त भावना संगमनेर खुर्दचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी व्यक्त केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 913
अमोल खताळ गणेश शिंदे बाळासाहेब थोरात रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द विद्युतीकरण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.