Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहज भेट अन् मोठ्या प्रश्नाचे उत्तर; नगरसेवक योगेश जाजूंच्या प्रयत्नाने ड्रेनेजचे काम सुरू!
राजकारण

सहज भेट अन् मोठ्या प्रश्नाचे उत्तर; नगरसेवक योगेश जाजूंच्या प्रयत्नाने ड्रेनेजचे काम सुरू!

प्रश्नाचे गांभीर्य ओळखून जाजू यांनी कोणताही विलंब न लावता त्याच ठिकाणाहून नगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

राजकारणापलीकडे जाऊन जेव्हा समाजकारण केले जाते, तेव्हा सामान्यांचे प्रश्न कसे मार्गी लागतात, याचा प्रत्यय संगमनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये आला आहे. नगरसेवक योगेश (चिकू) जाजू यांच्या तत्परतेमुळे परदेशपुरा आणि जुम्मा मशीद परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ड्रेनेजचा प्रश्न निकाली निघाला असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

संगमनेरमधील परदेशपुरा आणि जुम्मा मशीद हा दाट लोकवस्तीचा भाग आहे. या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेजची मोठी समस्या निर्माण झाली होती. सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत होती, याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत होता. अनेकदा मागणी करूनही तांत्रिक कारणांमुळे हे काम रखडलेले होते.

३-४ दिवसांपूर्वी नगरसेवक योगेश जाजू हे वैयक्तिक भेटीगाठींसाठी या परिसरात गेले होते. आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी जवळ आल्याचे पाहून स्थानिक रहिवासी आणि त्यांच्या मित्रांनी या गंभीर समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले. प्रश्नाचे गांभीर्य ओळखून जाजू यांनी कोणताही विलंब न लावता त्याच ठिकाणाहून नगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला.

केवळ सूचना देऊन न थांबता, योगेश जाजू यांनी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्यास भाग पाडले आणि कामाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. ड्रेनेज लाईनचे काम सुरू झाल्याने परिसरातील सांडपाण्याचा प्रश्न आता कायमचा मिटणार आहे.

अनेक वर्षे रखडलेले काम नगरसेवकाच्या एका भेटीमुळे आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे मार्गी लागल्याने परदेशपुरा भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तत्परता दाखवल्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी योगेश जाजू आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

📌 लोकांच्या मूलभूत समस्या सोडवणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. केवळ एका भेटीत नागरिकांची अडचण समोर आली आणि त्यावर मार्ग काढता आला, याचे मला मनस्वी समाधान आहे. यापुढेही प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असेल. — योगेश (चिकू) जाजू, नगरसेवक.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 968
ड्रेनेज योगेश जाजू
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील महिलांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संगमनेर नगर…

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.