Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात महिलांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला; भाजप आक्रमक, पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन
राजकारण

संगमनेरात महिलांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला; भाजप आक्रमक, पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन

विशिष्ट भागात चोऱ्यांचे प्रमाण जास्त आहे, त्या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे योग्य नियोजन करून गुन्हेगारांवर वचक बसवावा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

शहरासह परिसरात सध्या चोरट्यांनी उच्छाद मांडला असून महिलांचे मंगळसूत्र ओढण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात संगमनेर भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुधवारी पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.

सध्या सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडलेले असतानाच दागिने चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सध्या हिंदू समाजातील महिलांचे हळदी-कुंकवाचे कार्यक्रम सुरू असून वाण खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. याचाच फायदा घेत बस स्टँड, अशोक चौक, बाजारपेठ मेनरोड, नवीन नगर रोड, नाशिक रोड, इंदिरानगर आणि मालदाड रोड यांसारख्या वर्दळीच्या भागात दुचाकीवरून येणारे चोरटे महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून नेऊ लागले आहेत. या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत, पोलिसांनी अशा घटना रोखण्यासाठी तातडीने कडक पावले उचलावीत, अशी मागणी भाजपने केली आहे. ज्या विशिष्ट भागात चोऱ्यांचे प्रमाण जास्त आहे, त्या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे योग्य नियोजन करून गुन्हेगारांवर वचक बसवावा. तसेच शहरातील रेकॉर्डवरील (हिस्ट्रीशीटर) गुन्हेगारांना योग्य त्या कलमाखाली ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. महिलांचे सौभाग्य लेणे सुरक्षित राखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासन योग्य तऱ्हेने पार पाडेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी भाजपच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या कांचनताई ढोरे, रेश्माताई खांडरे, रेखाताई गलांडे आणि उषाताई कपिले यांच्यासह जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, सचिन खुळे, मुकुंद उपरे, मनोज जुंदरे, कल्पेश पोगुल, दीपक भगत, संपत गलांडे, रवी उडता, अमित गुप्ता, अविनाश फटांगरे, योगेश सूर्यवंशी, दीपेश ताटकर, पप्पू तेजी, संदीप मोहोळे, अविनाश ओझा, वैभव घुले, दीपक भालेराव, भरत ढोरे, किरण ढोरे, लक्ष्मीकांत हजारे, विकास गुळवे, जग्गु शिंदे, विकास शिंदे आणि अमोल रनाते इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 731
निवेदन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.