Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थोरात-तांबेंच्या उपस्थितीत रंगला शिवसेनेचा सोहळा; जिल्हा परिषद-पंचायत समितीसाठी सचिन कोते पाटलांचा निर्धार!
राजकारण

थोरात-तांबेंच्या उपस्थितीत रंगला शिवसेनेचा सोहळा; जिल्हा परिषद-पंचायत समितीसाठी सचिन कोते पाटलांचा निर्धार!

खासदार संजय राऊत, विनायक राऊत, खासदार अनिलभाऊ देसाई आणि संपर्कप्रमुख सुनीलजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकांसाठी शिवसैनिक सज्ज असल्याचे त्यांनी नमूद केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/01/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर:

पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरसह शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची वज्रमुठ बांधली असून, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही देत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी आगामी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लावलेली हजेरी महत्त्वाची ठरली.

हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून संगमनेर येथे आयोजित अभिवादन सोहळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख कोते बोलत होते. या सोहळ्याला महाविकास आघाडीचे नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित राहून शिवसेनाप्रमुखांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. 

नवीन नगर रोडवरील बस स्थानकासमोर झालेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन सोहळ्यावेळी मार्गदर्शन करताना सचिन कोते पाटील पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे ब्रीदवाक्य घेऊनच आमची वाटचाल सुरू राहील. घर तेथे शिवसैनिक आणि गाव तेथे शाखा हा नवा उपक्रम राबवून संघटना तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. खासदार संजय राऊत, विनायक राऊत, खासदार अनिलभाऊ देसाई आणि संपर्कप्रमुख सुनीलजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकांसाठी शिवसैनिक सज्ज असल्याचे त्यांनी नमूद केले.

विधान परिषद आमदार सत्यजित तांबे यांनीही उपस्थित राहून शिवसैनिकांशी संवाद साधला. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी असलेल्या योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला. तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेला अभिवादन केले. माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि घराघरात शिवसेना वाढवणे हीच साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले.

या सोहळ्यास तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, माजी शहरप्रमुख अमर कतारी, युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवा तालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ, युवा सेना शहरप्रमुख गोविंद नागरे, युवासेना तालुकाप्रमुख सागर भागवत, अजीज मोमीन (मुस्लिम मावळा), महिला आघाडीच्या उप जिल्हाप्रमुख आशा केदारी, शहरप्रमुख संगीता गायकवाड, वैशाली वडतल्ले, ३२ गाव आश्वी विभाग तालुकाप्रमुख प्रकाश गायकवाड, रंगनाथ फटांगरे, भीमा पावसे, २८ गाव घारगाव विभाग तालुकाप्रमुख अमित फटांगरे, रिक्षा सेनेचे तालुकाप्रमुख अशोक बडे, भांडकर, माघाडे, संजू सोनावणे, उपतालुकाप्रमुख भाऊसाहेब वराळे, बाळासाहेब कवडे, ग्राहक संरक्षक कक्षाचे तालुकाप्रमुख सदाशिव हासे, राजू सातपुते, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इम्तियाज शेख, युवा सेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद, उपशहर प्रमुख मुकेश काठे, रहिम बेग, प्रतीक मिसाळ, ज्येष्ठ शिवसैनिक दीपक साळुंखे, विभाग प्रमुख प्रकाश चोथवे, त्रिलोक कतारी, उपशहर प्रमुख प्रवीण चव्हाण, पठार भागातील ज्येष्ठ शिवसैनिक सुनील घुले, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य विजय सातपुते, सचिन धनवट, युवा सेना उपतालुका प्रमुख गुलाब कोकाटे, बाळासाहेब शिंदे, अभिषेक साबळे, युवासेनेचे फइम शेख, शुभम वाघ, महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे किरण घोटेकर, संकेत एखंडे, पगडाल सर, व्यापारी आघाडीचे शहर प्रमुख संभव लोढा, संगमनेर युवा सेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, युवा सेना उपशहर प्रमुख अक्षय गाडे, ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब घोडके, सुनील मोरे, अशोक भडकवाड, ब्रम्हा खिडके आणि दिलीप राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन युवासेना आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले होते. संपर्कप्रमुख नरेश माळवे, दिव्यांग सहाय्यसेना जिल्हाप्रमुख जालिंदर लहामगे, शिवसेना शहरप्रमुख असिफ तांबोळी आणि शिवसेना दक्षिण शहरप्रमुख वैभव अभंग यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,019
अमर कतारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती सचिन कोते
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.