Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१० हजारांची लाच घेताना वनपालास पकडले

26/10/2026

सोमवार २६ ऑक्टोबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

26/10/2026

एसएमबीटीचा स्तुत्य उपक्रम | दोन वर्षात २४ डोहाळे जेवण; मोफत १८ हजार सोनोग्राफी आणि दोन हजार महिलांच्या प्रसूती

25/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रघुभाऊंना पद्मश्री पुरस्कार… हा तर अवघ्या तमाशा विश्वाचा सन्मान, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय लोककला तमाशा क्षेत्रातील योगदानासाठी पहिला पद्म पुरस्कार… आठवणी रघुभाऊच्या पद्म प्रवासाच्या
महाराष्ट्र संवाद विशेष

रघुभाऊंना पद्मश्री पुरस्कार… हा तर अवघ्या तमाशा विश्वाचा सन्मान, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय लोककला तमाशा क्षेत्रातील योगदानासाठी पहिला पद्म पुरस्कार… आठवणी रघुभाऊच्या पद्म प्रवासाच्या

आता अमित शहा साहेबांना आमच्यावतीने तुम्ही भेटा, आम्ही दुपारी परत निघतोय. आज या निमित्ताने लोखंडे साहेबांनी केलेल्या प्रयत्नांची आठवण होतेय.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/01/2026Updated:26/01/2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

डॉ. संतोष खेडलेकर, संगमनेर
संतोषभाऊ… आज आई पाहिजे होती… एक हुंदका बाहेर पडला आणि क्षणभर आम्ही दोघेही नि:शब्द झालो… रघुभाऊ फोनवर बोलत होते. एकीकडे आनंद आणि दुसरीकडे मागील पंचावन्न वर्षांचा तमाशा रंगभूमीवरचा प्रवास आठवत भाऊ बोलत होते. सन २०१५ पासून तमाशा लोककलेला पद्म पुरस्कार मिळावा म्हणून पाठपुरावा सुरु होता. सुरुवातीची अनेक वर्षे कांताबाई सातारकर यांना पद्म पुरस्कार मिळावा म्हणून पाठपुरावा सुरु होता. त्यानंतर दरवर्षी सप्टेंबर महिना आला की पद्मसाठीचा अतिशय क्लिष्ट असा फॉर्म भरायला सुरुवात व्हायची. यासाठी सुरुवातीला माझे मित्र ज्ञानेश्वर केदार यांच्या मदतीने अविनाश वर्पे यांच्याकडे हे काम चालायचे. पुढे या सगळ्याचा सराव झाला. दरम्यान कोविडमध्ये कांताबाई गेल्या. नंतर रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार मिळावा म्हणून प्रयत्न सुरु झाला. तमाशा ही महाराष्ट्रातील सर्वाधिक भागात सादर होणारी सर्वाधिक लोकप्रिय कला. मात्र सिनेमावाल्यांनी ही कला इतकी बदनाम केली की काही मोजके सन्माननीय अपवाद वगळता बहुतांशी पांढरपेशा लोकांनी तमाशा म्हणजे अतिशय वाईट असा समज करून घेतला. अशा परिस्थितीत पद्मची शिडी चढणे किती कठीण होते याचा विचार आपण करू शकाल.
तमाशाने महाराष्ट्राला काय दिले याबद्दल लिहायचे झाले तर तो स्वतंत्रपणे दोन तीन भागात लिहायचा विषय होईल. २०२२ नंतर रघुभाऊंना पद्म पुरस्कार मिळावा म्हणून प्रयत्न सुरु झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिफारस केली होती. त्याच्या पुढच्या वर्षी तत्कालीन खासदार सदाशिव लोखंडे यांनी आम्हाला रागुवीर खेडकर यांच्या पद्म पुरस्काराचा प्रस्ताव घेऊन थेट दिल्लीत यायला सांगितले. रघुभाऊचा हा पहिलाच विमान प्रवास होता. खासदार लोखंडे साहेबांनी आमचा उत्तम पाहुणचार केला. नवीन संसद भवन सुरु झाले त्याचा पहिलाच दिवस होता. त्या दिवशी देशाच्या विविध प्रांतातून महिलांना संसदेत निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी इतरांना संसदेत प्रवेश दिला जाणार होता. मी, रघुवीर खेडकर, त्यांच्या तमाशाचे व्यवस्थापक शफी भाई आणि खासदार खासदार लोखंडे साहेब नवीन संसद भवनात गेलो. अकरा वाजता लोकांना संसदेत प्रवेश मिळणार होता. आम जनतेला संसदेत प्रवेश देण्याचा पहिलाच दिवस असल्याने लोकांमध्ये मोठी उत्सुकता होती. स्वतः खासदार सोबत असल्याने आम्हाला रांगेत उभे रहावे लागले नाही. लोखंडे साहेब सोबत असल्याने आम्हाला इतरांपेक्षा पाच सात मिनिटे अगोदर प्रेक्षक गॅलरीत सोडले आणि आम्ही आत जात असताना तिथल्या अधिकाऱ्याने सांगितले, आम लोगो के लिये आज ही संसदभवन मे प्रवेश दिया जा रहा है और आप पहले हो जो नये संसद भवन में प्रवेश कर रहे हो… हे ऐकताच अंगावर काटा आला. आपण एका इतिहासाचे साक्षीदार तर होत आहोतच परंतु नवी संसदेत प्रवेश करणारे देशाचे पहिले सर्वसामान्य नागरिक आहोत. संसदेत गेल्यावर लोखंडे साहेबांनी केंद्रीय मंत्री नीतिन गडकरी, खासदार श्रीनिवास पाटील यांना पद्मची निवेदने दिली. नंतर उद्योग भवनमध्ये तत्कालीन अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांना भेटून त्यांनाही निवेदन दिले. राणे साहेबांना भेटून बाहेर पडताना खासदार लोखंडे यांनी सांगितले की त्यांनी त्याच दिवशी संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याचे नियोजन ठरवून टाकले होते. भाऊ आणि आम्ही एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघायला लागलो कारण त्याच दिवशी दुपारचे परतीचे तिकीट आम्ही अगोदरच काढून ठेवले होते. अखेरीस लोखंडे साहेबांना आम्ही सांगितेल, साहेब कालपासून तुम्ही आमच्यासाठी खूप धावपळ करत आहात, आमच्या अपेक्षेपेक्षाही तुम्ही खूप जास्त प्रयत्न केले आहेत, आता अमित शहा साहेबांना आमच्यावतीने तुम्ही भेटा, आम्ही दुपारी परत निघतोय. आज या निमित्ताने लोखंडे साहेबांनी केलेल्या प्रयत्नांची आठवण होतेय.
मागच्या वर्षी दरवर्षीप्रमाणे पद्मचा फॉर्म भरून पाठवला पण काहीच घडले नाही. यावर्षी मात्र काहीच करायचे नाही असे ठरवले परंतु ६ जानेवारीला शफीभाई माझ्याकडे आले आणि नगरला कलेक्टर ऑफिसला काही माहिती पाठवायची आहे तुम्हाला फोन येईल तुम्ही पुढची प्रोसेस करा असे सांगितले. अहिल्यानगरहून गणेश माळवे यांनी अजिबात न कंटाळता एकेक माहिती मागवून घेतली, हे करताना पूर्वीचा अनुभव लक्षात घेता केवळ यंत्रवत माहिती देत होतो. परंतु चमत्कार झाला… माझे मेव्हणे जितेंद्र जोशी यांचा फोन आला, रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
जरावेळ सुन्न झालो, भाऊला फोन लावला, मी नमस्कार भाऊ म्हणताच समोरून भाऊचे पहिले वाक्य ऐकू आले, संतोषभाऊ आज आई पाहिजे होती… आणि एक हुंदका बाहेर पडला… भाऊ आज कौतुकाला, अभिनंदनाला शब्द नाहीत… फक्त एकच म्हणेन आपला अभिमान वाटतो भाऊ… रघु भाऊच्या पद्मच्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून आभार.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 220
रघुवीर खेडकर संतोष खेडलेकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

१० हजारांची लाच घेताना वनपालास पकडले

By Annant Ppangarkar26/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शेतातील मातीचा भराव सुरू ठेवण्यासाठी कारवाईची भीती दाखवून १० हजार रुपयांची…

सोमवार २६ ऑक्टोबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

26/10/2026

एसएमबीटीचा स्तुत्य उपक्रम | दोन वर्षात २४ डोहाळे जेवण; मोफत १८ हजार सोनोग्राफी आणि दोन हजार महिलांच्या प्रसूती

25/10/2026

संजय गांधी नगर अन् वडारवस्तीच्या घरांचे उतारे नागरिकांच्या नावावर करण्याची आमदार अमोल खताळ यांची ग्वाही; शिवसेना शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी आश्वासन

25/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.