Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून बारामती येथे पवार कुटुंबीयांचे सांत्वन, अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी
श्रद्धांजली

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून बारामती येथे पवार कुटुंबीयांचे सांत्वन, अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी

कोरोना संकटाच्या काळात एकदिलाने आम्ही सर्वांनी काम केले. पक्ष वेगळे असले तरी मनाने कायम आम्ही एकत्र राहिलो.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-

ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व प्रश्नांची जाण असणारे महाराष्ट्राचे रोखठोक नेतृत्व म्हणून लोकप्रिय झालेले अजित दादा पवार यांच्या आकस्मात निधनाने महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी मोठी हानी झाली असल्याचे काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असून त्यांनी आज पवार कुटुंबियांचे सांत्वन केले.

विद्या प्रतिष्ठान येथे जाऊन अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन केले. याप्रसंगी काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी उपस्थित होते. थोरात यांनी पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबियांची भेट घेतली.

याप्रसंगी बोलताना थोरात म्हणाले की, 1990 पासून अजित पवार हे राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे. ग्रामीण आणि शहरी प्रश्नांची जाण असलेला हा मोठा नेता होता. ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाला बळकटी दिली. आपल्या रोखठोक स्वभावांमधून राजकारणात आणि समाजकारणात मोठे स्थान निर्माण केले.

प्रशासनावर पकड असलेले अजित दादा हजरजबाबी होते. अत्यंत रुबाबदार व्यक्तिमत्व असलेल्या अजितदादा आणि आपण मंत्रिमंडळात अनेक वर्ष काम केले. पटकन निर्णय घेऊन पाठपुरावा करण्याची त्यांची पद्धत लोकप्रिय होती. राजकारणात असूनही तोंडावर स्पष्ट बोलणारे दादा हे महाराष्ट्राचे लाडके होते.

विविध खात्यांचे मंत्रीपद सांभाळताना त्यांनी त्या खात्याला अधिक गतिमानता दिली. कोरोना संकटाच्या काळात एकदिलाने आम्ही सर्वांनी काम केले. पक्ष वेगळे असले तरी मनाने कायम आम्ही एकत्र राहिलो. अजितदादा आज नाहीत ही कल्पना होत नाही. 28 जानेवारी रोजी झालेला अपघात हा सर्वांसाठी अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने राज्याचा मोठा उमदा नेता गमावला असून कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नेते पवार साहेब, सुनेत्राताई पवार आणि सर्व पवार कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी असल्याचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,658
अजित पवार बाळासाहेब थोरात श्रद्धांजली
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.