Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हॉटेलमध्ये काम करणाऱ्या संगमनेरच्या तरुण कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या
महाराष्ट्र संवाद विशेष

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या संगमनेरच्या तरुण कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत बंद खोलीचा दरवाजा उघडला असता, विशाल वायकर याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिर्डी:

तीर्थक्षेत्र शिर्डी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका नामांकित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका तरुण कामगाराने हॉटेलमधील खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर हॉटेल परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव विशाल रवींद्र वायकर असून त्याचे वय अंदाजे २२ वर्षे होते. विशाल हा मूळचा संगमनेर तालुक्यातील रहिवासी होता. रोजगाराच्या शोधात तो शिर्डीत आला होता आणि सध्या राहता तालुक्यातील गणेश नगर येथे वास्तव्यास होता. तो गेल्या काही काळापासून शिर्डीतील एका हॉटेलमध्ये कामगार म्हणून सेवा बजावत होता.

सोमवारी दुपारच्या सुमारास हॉटेलमधील एका खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे व्यवस्थापनाच्या लक्षात आले. बराच वेळ उलटूनही आणि वारंवार आवाज देऊनही आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांची चिंता वाढली. संशय बळावल्याने व्यवस्थापनाने तातडीने शिर्डी पोलिसांना पाचारण केले. माहिती मिळताच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत बंद खोलीचा दरवाजा उघडला असता, विशाल वायकर याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा सखोल पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याने पोलीस आता विशालच्या मोबाईलमधील मेसेज, कॉल रेकॉर्ड्स आणि त्याच्या मित्रपरिवाराकडे चौकशी करत आहेत. मानसिक तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे का, यादृष्टीनेही तपास सुरू आहे. शिर्डी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,657
आत्महत्या गळफास
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आर्थिक

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडियावरील रिल्स, भ्रामक ट्रेंड आणि ऑनलाइन चर्चांच्या…

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.