Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘शतक’ चित्रपटाचे शो सुरू न केल्यास तीव्र आंदोलन: शिवसेना-भाजपा महायुतीचा संगमनेरमध्ये इशारा
राजकारण

‘शतक’ चित्रपटाचे शो सुरू न केल्यास तीव्र आंदोलन: शिवसेना-भाजपा महायुतीचा संगमनेरमध्ये इशारा

आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मालपाणी मल्टीप्लेक्सच्या व्यवस्थापकांची भेट घेतली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त निर्मित ‘शतक’ या चित्रपटाला देशभरात मोठा प्रतिसाद मिळत असताना, संगमनेरमधील मालपाणी मल्टीप्लेक्समध्ये अद्याप हा चित्रपट प्रदर्शित न झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपा महायुतीच्या वतीने चित्रपटगृह व्यवस्थापकांना निवेदन देऊन तातडीने शो सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मालपाणी मल्टीप्लेक्सच्या व्यवस्थापकांची भेट घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रदीर्घ समाजकार्याचा इतिहास आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावे, हा ‘शतक’ चित्रपटाचा मुख्य उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले. स्थानिक प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता असूनही तो प्रदर्शित न करणे ही खेदजनक बाब असल्याची भावना महायुतीने व्यक्त केली आहे.

याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, भाजप तालुका सरचिटणीस महेश मांडेकर, शहर सरचिटणीस भारत गवळी आणि शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख दिपाली वाव्हळ यांनी व्यवस्थापनाकडे आपली नाराजी व्यक्त केली. चित्रपटाचे नियमित शो त्वरित सुरू न झाल्यास महायुती स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.

निवेदन देताना शिवसेना उपतालुका प्रमुख रणजीत जाधव, पूजा अरगडे, रणजीत गायकवाड, वरद बागुल, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख, तालुकाप्रमुख सुशील शेवाळे, शहरप्रमुख सार्थक शेवाळे, युवती शहरप्रमुख शिवाज्ञा अरगडे, अविनाश फटांगरे, प्रणव सातपुते, राहुल पखळे आणि सुनील चांडे यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता चित्रपटगृह प्रशासन यावर काय सकारात्मक निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 512
निवेदन महायुती मालपाणी मल्टिप्लेक्स
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.