Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड
राजकारण

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड

मध्यंतरी या पदासाठी प्रफुल पटेल यांच्या नावाची चर्चा होती, मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक रचनेत ऐतिहासिक फेरबदल करण्यात आले असून, राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी सुनेत्रा पवार यांची निवड होणे निश्चित मानले जात होते. वरळी डोम येथील सभागृहात पार पडलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली.
राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने आणि हात उंचावून पाठिंबा दर्शवला.
या निवडीनंतर प्रफुल पटेल यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाचा गौरव करताना त्यांना एका खऱ्या सेनापतीची उपमा दिली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशात अजित पवारांचे योगदान अमूल्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
मध्यंतरी या पदासाठी प्रफुल पटेल यांच्या नावाची चर्चा होती, मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. आता आगामी काळात सर्व नेतेमंडळी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजित पवारांच्या अनुपस्थितीत हे राष्ट्रीय अधिवेशन पार पाडण्याची वेळ येणे हे दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी अजित पवारांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेतला. विशेषतः २०२४ च्या निवडणुकीत पक्षाला सर्वात मोठा पक्ष बनवण्यात अजित पवारांचे मोठे योगदान होते, असे त्यांनी आवर्जून सांगितले. सुनेत्रा पवार आता राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदासह पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी कशा प्रकारे हाताळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 271
सुनेत्रा पवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवड

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर नगरपरिषद क्षेत्रासाठीच्या पथ विक्रेता तक्रार निवारण व…

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.