Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे स्वरूप कसे असावे? संगमनेरकरांना मतदानाची संधी; ५ ते ७ मार्च दरम्यान बस स्थानक परिसरात विशेष उपक्रम
महाराष्ट्र संवाद विशेष

छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे स्वरूप कसे असावे? संगमनेरकरांना मतदानाची संधी; ५ ते ७ मार्च दरम्यान बस स्थानक परिसरात विशेष उपक्रम

या ऐतिहासिक उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी (५ मार्च) सकाळी ९ वाजता होणार आहे. याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांच्यासह विविध मान्यवर आणि शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, हे स्मारक नेमके कोणत्या स्वरूपाचे असावे, याचा निर्णय आता थेट जनतेच्या कौलाने घेतला जाणार आहे.
संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने ५ ते ७ मार्च दरम्यान एका विशेष मतदान प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये नागरिक आपल्या पसंतीच्या स्मारकाच्या आराखड्याला मत देऊ शकणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांनी दिली आहे. शहराच्या अस्मितेशी जोडल्या गेलेल्या या निर्णयामध्ये संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले मत नोंदवावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
​या स्मारकाच्या पार्श्वभूमीवर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे यांनी शासन पातळीवर सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांतून १८ डिसेंबर २०२३ रोजी राज्य शासनाकडे बस स्थानकासमोरील १५ बाय १५ मीटर जागा नगरपालिकेकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर स्मारकाचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
​स्मारकाच्या रचनेबाबत शहरातील शिवप्रेमींमध्ये विविध मतप्रवाह आहेत. काही नागरिकांना महाराजांचे पूर्णाकृती उभे स्मारक हवे आहे, तर काही जणांनी सिंहासनाधीश्वर स्मारकाची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अनेक शिवभक्तांनी अश्वारूढ स्मारकाची मागणी लावून धरली आहे. जनभावनांचा आदर करत आणि या प्रक्रियेत पारदर्शकता जपण्यासाठी नगरपालिकेने लोकसहभागातून अंतिम निर्णय घेण्याचे ठरवले आहे.
​या उपक्रमांतर्गत ५, ६ आणि ७ मार्च रोजी बस स्थानकावरील सुप्रीम पावभाजी समोर विशेष कक्ष उभारला जाईल. तिथे उभे स्मारक, सिंहासनाधीश्वर स्मारक आणि अश्वारूढ स्मारक या तिन्ही पर्यायांच्या त्रिमितीय (3D) प्रतिमा नागरिकांना पाहता येतील. शहरातील प्रत्येक नागरिकाला तिथे प्रत्यक्ष मतदान करून आपली पसंती नोंदवता येईल.
​या ऐतिहासिक उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी (५ मार्च) सकाळी ९ वाजता होणार आहे. याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांच्यासह विविध मान्यवर आणि शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 534
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मैथिली तांबे संगमनेर नगरपरिषद सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

By Annant Ppangarkar06/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र…

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.