Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तुकाराम मुंडेंचा आदेश अन् अहिल्यानगरमध्ये धडक कारवाई! नामांकित ब्रँड्सचे लाखो रुपयांचे अन्नपदार्थ जप्त
प्रशासन

तुकाराम मुंडेंचा आदेश अन् अहिल्यानगरमध्ये धडक कारवाई! नामांकित ब्रँड्सचे लाखो रुपयांचे अन्नपदार्थ जप्त

नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत काहीही शंका असल्यास त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर:

अहिल्यानगर जिल्ह्यात प्रशासनाकडून अन्न भेसळविरोधी विशेष मोहीम तीव्र करण्यात आली असून, या अंतर्गत राहुरी आणि नेवासा तालुक्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण २ लाख ८४ हजार १८० रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम आणि खाद्यतेल जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न विभागाचे सहायक आयुक्त अ. अ. भोईटे यांनी दिली आहे.

या मोहिमेदरम्यान राहुरी येथील ‘शिवशक्ती आईस्क्रीम’ या दुकानाची तपासणी करण्यात आली. तेथून ‘शिवशक्ती’ ब्रँडच्या गुलकंद आणि अमेरिकन नट्स आईस्क्रीमचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. हे आईस्क्रीम दर्जाहीन असल्याच्या संशयावरून प्रशासनाने ४१ हजार ४४० रुपये किमतीचे एकूण १४८ पॅकेट्स जप्त केले आहेत.

दुसऱ्या कारवाईत नेवासा तालुक्यातील कडू गल्ली येथील ‘संतोष किराणा स्टोअर्स’वर छापा टाकण्यात आला. तिथे ‘एसबीजी’ ब्रँडच्या रिफाइंड पामोलीन खाद्यतेलाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. हा साठा संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी २ लाख ४२ हजार ७४० रुपये किमतीचे १ हजार ४९८.४ किलो खाद्यतेल जप्त केले आहे.

अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार आणि सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ व नियम २०११ अंतर्गत ही विशेष मोहीम राबवली जात आहे. या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार, उ. र. पाटील आणि सहायक आयुक्त अ. अ. भोईटे यांनी थेट सहभाग घेतला. नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत काहीही शंका असल्यास त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,476
अन्न व औषध प्रशासन अहिल्यानगर छापे तुकाराम मुंढे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.