Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश
राजकारण

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात झालेल्या या घडामोडींमुळे विधान परिषद निवडणुकीच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाले असून उर्वरित जागांवरील लढतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 4, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यातील विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विविध मतदारसंघांत उमेदवारांनी माघार घेतल्याने काही ठिकाणी निवडणूक केवळ औपचारिकता राहिली आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघातून महायुतीचे विक्रम काकडे बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) समर्थित उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्यानंतर ही स्थिती निर्माण झाली.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले आहेत. मविआचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतल्याने तटकरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात दुश्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून भाजपचे अरुण लखानी बिनविरोध विजयी झाले. काँग्रेसचे शैलेश कुमार अग्रवाल तसेच अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी यांनी उमेदवारी मागे घेतल्याने ही परिस्थिती निर्माण झाली.

ठाण्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर शिंदे सेनेचे रवींद्र फाटक यांचीदेखील बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात झालेल्या या घडामोडींमुळे विधान परिषद निवडणुकीच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाले असून उर्वरित जागांवरील लढतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 324
बिनविरोध विधान परिषद निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026

महायुतीत बंडखोरीची चिन्हे; शिवसेनेचं डोकं उडवण्याचं काम भाजप करत आहे: अब्दुल सत्तार यांच्या आरोपाने महायुतीत खळबळ

June 1, 2026

“81 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून सरकारची मोठी फसवणूक; महिलांच्या विश्वासाला तडा” – बाळासाहेब थोरातांचा घणाघात

June 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

By अनंत पांगारकरJune 4, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | मुंबई/बुलढाणा: भारतीय जनता पक्षाला देशात लोकशाही नको असून, ‘इलेक्शन सिस्टिम’…

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.