Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर नगरपरिषदेचा दणका: भाजप नेत्याच्या मुलाविरुद्ध अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेर नगरपरिषदेचा दणका: भाजप नेत्याच्या मुलाविरुद्ध अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश

पालिका प्रशासनाची नजर आता शहरातील पक्क्या बांधकामांकडे वळल्याने या रोखठोक कारवाईमुळे आता पोलीस प्रशासन संबंधित भाजप नेत्याच्या मुलाविरुद्ध कधी आणि काय कारवाई करते, याकडे संपूर्ण संगमनेर शहराचे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर:

संगमनेर शहरात अनधिकृत बांधकामाचा प्रश्न चांगलाच तापला असून, यामध्ये राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तीवर नगरपरिषदेने अखेर कायदेशीर बडगा उगारला आहे. संगमनेरमधील भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्याच्या मुलाविरुद्ध विनापरवाना व बेकायदेशीर इमारत बांधकाम केल्याप्रकरणी आणि पालिकेच्या नोटिसांना केराची टोपली दाखवल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे थेट आदेश संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी शहर पोलिसांना दिले आहेत. या धडक कारवाईमुळे शहरातील भूमाफिया आणि बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत अशोक इथापे यांनी संगमनेर येथील सुकेवाडी रोड परिसरातील सर्व्हे नंबर १५३/१/१ मधील अंदाजे ६५० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या भूखंडावर नगरपरिषदेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता थेट ‘जी प्लस ४’ (तळमजला अधिक चार मजले) अशा टोलेजंग इमारतीचे अनधिकृत बांधकाम सुरू केले होते.

या बेकायदेशीर बांधकामाबाबत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५४ अन्वये नगरपरिषदेमार्फत यापूर्वी दि. १७/१२/२०२४ आणि त्यानंतर दि. ३०/०३/२०२६ रोजी अशा दोन वेळा रीतसर नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या नोटिसांद्वारे हे अनधिकृत बांधकाम त्वरित थांबवण्याचे आणि केलेले बांधकाम स्वतःहून काढून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, संबंधिताने या दोन्ही कायदेशीर नोटिसांना पूर्णपणे केराची टोपली दाखवली आणि आपले बेकायदेशीर बांधकाम सुरूच ठेवले.

या दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या धोकादायक आणि अनधिकृत बांधकामाविरोधात नगरपरिषदेकडे तीव्र तक्रारी केल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन दि. ०५/०६/२०२६ रोजी स्थानिक पालिका प्रशासनाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर आले. नोटिसा मिळालेल्या असतानाही संबंधित जागेवर पाचव्या मजल्यावर ब्लॉक बसवण्याचे काम सर्रास सुरू होते. अत्यंत निष्काळजीपणे सुरू असलेल्या या बांधकामाचे सिमेंट ब्लॉक शेजारीच राहणारे अयुब मणियार यांच्या इमारतीवर, अंगणात तसेच पश्चिम बाजूच्या सार्वजनिक रस्त्यावर पडल्याचे आढळून आले. या बेजबाबदार कृत्यामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून, कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे.

अखेर या गंभीर प्रकरणाची दखल घेत मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना लेखी आदेश जारी केले आहेत. आरोपीने ‘एमआरटीपी’ कायद्याच्या कलम ५२ आणि ५४ च्या तरतुदींचे सरळ-सरळ उल्लंघन केले असून हा गुन्हा दखलपात्र स्वरूपाचा आहे, त्यामुळे संबंधितावर तात्काळ कायदेशीर गुन्हा दाखल करावा, अशी स्पष्ट मागणी पालिकेने केली आहे. तसेच या प्रकरणात कायदेशीर कारवाईसाठी रचना सहाय्यक श्रीमती वैष्णवी गडाख आणि सहायक नगररचनाकार (प्रभारी) ओंकार सहाणे यांना मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने प्राधिकृत करण्यात आले आहे.

पालिका प्रशासनाची नजर आता शहरातील पक्क्या बांधकामांकडे वळल्याने या रोखठोक कारवाईमुळे आता पोलीस प्रशासन संबंधित भाजप नेत्याच्या मुलाविरुद्ध कधी आणि काय कारवाई करते, याकडे संपूर्ण संगमनेर शहराचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,024
अवैध बांधकाम गुन्हा दयानंद गोरे शहर पोलीस संगमनेर नगरपरिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

By Annant Ppangarkar06/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र…

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.