Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या
राजकारण

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीचं प्रकरण ताजं असताना, त्याबद्दल रामभक्तांमध्ये संताप असताना आता श्रीरामाच्या नावानं झालेला एक गंभीर घोटाळा समोर आला आहे. बीएड आणि शिक्षक प्रशिक्षण कॉलेजांचं कागदांवरील साम्राज्य उघडकीस आलं आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये अनेक कॉलेज शेतांमध्ये, ओसाड जागांवर नोंदणीकृत आहेत. तिथे गेल्यावर दिसणारी परिस्थिती वेगळीच आहे.

काही कॉलेज लहान शाळांच्या परिसरांमध्ये भरत आहेत. काही ठिकाणी तर एकाच पत्त्यावर तीन-तीन संस्थांना मान्यता देण्यात आलेली आहे. प्रत्यक्ष पडताळणीत अनेक त्रुटी आणि गायब पत्ते सापडल्यानंतरही बरकतउल्ला विद्यापीठाने केवळ एका नोटरी शपथपत्राच्या आधारावर १२५ खासगी बीएड कॉलेजांच्या प्रवेश प्रक्रियेला हिरवा झेंडा दाखवला आहे. या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याला धोका निर्माण झाला आहे.

राजधानी भोपाळमधील विदिशा रोडवर श्रीराम कॉलेज आहे. भूखंड क्रमांक १४८/१४९/२/१ वर श्रीराम कॉलेजची नोंद आहे. या कॉलेजमधून दरवर्षी १५० विद्यार्थी (१०० बीएड आणि ५० बीएससी बीएड) शिकून बाहेर पडतात. पण या कॉलेजच्या पत्त्यावर श्रीराम कॉलेज नावाची कोणतीही संस्था दिसत नाही. या परिसरात तीन भवन आहेत. त्यातील एक बंद होतं. दुसऱ्यावर मिलेनियम ग्रुपचा फलक होता. तर तिसऱ्याचं काम सुरू आहे. त्याच्या बाहेर बगलामुखी कॉलेजचा फलक लावण्यात आलेला होता.

श्रीराम कॉलेजच्या नावावर नोंद असलेल्या भूखंड क्रमांक १४८ वर केवळ एक रिकामं शेत आहे. तिथे शेती होते. पण तिथे कोणतंही कॉलेज, वर्ग, प्रयोगशाळा, ग्रंथालय नाही. पण कागदांवर दरवर्षी प्रवेश होतात, परीक्षा घेतल्या जातात आणि पदव्याही वाटल्या जातात. हा सगळा प्रकार गेल्या १० वर्षांपासून सुरू आहे. कागदावर असलेल्या कॉलेजांचा सिलसिला केवळ श्रीराम कॉलेजपुरता मर्यादित नाही. भोपाळच्याच बावडिया कलामध्ये सेव्हियर कॉलेज एका लहानशा शाळेच्या परिसरात चालतं. याच ठिकाणी एका सोसायटीचं कार्यालयदेखील आहे. या ठिकाणी विद्यार्थी येतात. पण नियमित येत नाहीत, अशी कबुली कॉलेजच्या प्राचार्या डॉ. प्रिती श्रीवास्तव यांनी दिली. भोपाळच्याच साकेत नगरात कागदावर असलेल्या ‘कमलनाथ बीपीएड कॉलेज’च्या पत्त्यावर एका खोलीत केवळ शिक्षिका बसलेली होती. कॉलेज दुसरीकडेच सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 343
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.