Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने संगमनेरात शेतकऱ्यांचा दीड तासांचा महामार्ग रोको मागे शासकीय बफर स्टॉकमधून युरिया मिळताच आंदोलन स्थगनावर शिक्कामोर्तब; लिंकिंग आणि ढिसाळ नियोजनावरून महायुती सरकारवर कडाडून टीका
आंदोलन

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने संगमनेरात शेतकऱ्यांचा दीड तासांचा महामार्ग रोको मागे शासकीय बफर स्टॉकमधून युरिया मिळताच आंदोलन स्थगनावर शिक्कामोर्तब; लिंकिंग आणि ढिसाळ नियोजनावरून महायुती सरकारवर कडाडून टीका

बफर स्टॉक वाटपाचे अधिकार शेतकी संघाकडे देण्याची मागणी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/07/2026Updated:21/07/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर :
खरीप हंगामाच्या ऐन गर्दीत सातत्याने मागणी करूनही युरिया खत उपलब्ध होत नसल्याने संतप्त झालेल्या संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाशिक-पुणे महामार्गावर सुमारे दीड तास आक्रमक रास्ता रोको आंदोलन केले. महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र निषेध नोंदवत शेतकऱ्यांनी संपूर्ण वाहतूक रोखून धरली होती. आंदोलनाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन प्रशासन व काही शेतकऱ्यांनी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांना मध्यस्थीची विनंती केली. थोरात यांनी तातडीने कृषी विभागाला शासकीय बफर स्टॉकमधील युरिया मोकळा करण्याच्या सूचना दिल्या आणि प्रशासनाने ती मागणी मान्य करताच शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
नाशिक-पुणे महामार्गावर मंगळवारी सकाळपासूनच शेतकरी बांधव आणि महिला युरियासाठी पहाटे पाच वाजेपासून रांगेत उभे होते. मात्र, खतांचा तुटवडा आणि अपुरा पुरवठा यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटला आणि महामार्गावर भव्य रास्ता रोको सुरू झाला. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस उपनिरीक्षक विकास ढोकरे यांच्यासह कृषी आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते.
या प्रसंगी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, खरीप हंगामात पिकांना वेळेवर खत मिळणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. शासनाकडे युरियाचा बफर स्टॉक उपलब्ध असतानाही तो शेतकऱ्यांना वितरीत करण्यासाठी परवानगी दिली जात नाही, हे अत्यंत खेदजनक आहे. सध्या खतांचा काळाबाजार सुरू असून, भाववाढ आणि वाटपातील नियोजनाच्या अभावामुळे राज्य सरकारचा कारभार पूर्णपणे ढिसाळ आणि गोंधळाचा झाला आहे. आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात राज्याचा कृषिमंत्री म्हणून काम करताना अशी भीषण आणि अव्यवस्थित परिस्थिती कधीही पाहिली नव्हती, असा टोलाही त्यांनी लगावला.
बाळासाहेब थोरात यांनी खासगी कंपन्या आणि विक्रेत्यांकडून चालणाऱ्या ‘खत लिंकिंग’च्या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांना नडवून त्यांच्या मानगुटीवर नको असलेली खते बळजबरीने लादली जात आहेत आणि हे धाडस वरिष्ठांच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही, असा थेट आरोप त्यांनी केला. एकीकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही आणि दुसरीकडे काळाबाजारातून खते विकली जात असताना प्रशासनाचे त्यावर कोणतेही नियंत्रण उरलेले नाही. त्यामुळे प्रशासनाने ताब्यात असलेला बफर स्टॉक तातडीने रिलीज करावा, असा इशारा थोरात यांनी दिला.
प्रशासनाने थोरात यांच्या सूचनेनुसार बफर स्टॉकमधील युरिया वाटप करण्याचे मान्य केल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधानी होऊन आंदोलन मागे घेतले. या निर्णयानंतर उपस्थित शेतकरी बांधवांनी ‘बाळासाहेब थोरात जिंदाबाद’ आणि ‘शेतकऱ्यांची जाण असणारे नेतृत्व’ अशा घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला.
बफर स्टॉक वाटपाचे अधिकार शेतकी संघाकडे देण्याची मागणी –
खासगी केंद्रचालकांकडून खतांचे लिंकिंग, वशिलेबाजी आणि गैरप्रकार होत असल्याने शासकीय बफर स्टॉकमधील युरिया वाटपाचे सर्व अधिकार संगमनेर तालुका शेतकी संघाकडेच द्यावेत, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात केली. संगमनेर शेतकी संघ अत्यंत पारदर्शकपणे काम करत असल्याने सर्व शेतकऱ्यांना न्याय्य आणि योग्य पद्धतीने खताचा पुरवठा होईल, असा विश्वास व्यक्त करत प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची पूर्ण सांगता झाली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 751
आंदोलन खते लिंकिंग बफर स्टॉक बाळासाहेब थोरात युरिया रास्ता रोको
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.