Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

07/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

आज सोमवार, ०७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

07/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात
गुन्हेगारी

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर यांच्यामार्फत अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/07/2026Updated:24/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
संगमनेर शहरात अवैध गोवंश तस्करी आणि कत्तलीच्या माध्यमातून संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळीविरुद्ध पोलिसांनी अत्यंत कठोर कायदेशीर भूमिका घेतली आहे. शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणातील आरोपींवर आता अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशावरून नवीन भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १११ (संघटित गुन्हेगारी) हे अतिरिक्त वाढीव कलम लावून कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी रात्री संगमनेर-पुणे रस्त्यावर देवीगल्लीच्या पाठीमागे विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या ‘छोटा हत्ती’ (MH 14 CD 0839) वाहनाची तपासणी करण्यात आली होती. त्यात सुमारे तीन लाख रुपये किमतीचे ५०० किलो गोवंश जातीच्या जनावराचे मांस आढळून आले होते. पोलिसांनी या कारवाईत वाहन व मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणात सलीम रियाज कुरेशी व अतिक उर्फ सोनु रफिक कुरेशी (दोघे रा. मोगलपुरा, संगमनेर) या आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला होता. या दोन्ही आरोपींचा यापूर्वीचा गुन्हेगारी अभिलेख तपासला असता, त्यांच्यावर प्राणि संरक्षण कायदा व इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे आधीपासूनच दाखल असल्याचे समोर आले.
केवळ आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी बनवून गोवंश जनावरांची अवैध वाहतूक, कत्तल, आणि गोमांस विक्रीचा बेकायदेशीर व्यवसाय हे आरोपी सातत्याने करत असल्याचे दिसून आले. या संघटित गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्याची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर यांच्यामार्फत अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाचे अवलोकन करून वाघचौरे यांनी या गुन्ह्यात बीएनएस कलम १११ हे अतिरिक्त कलम वाढवण्यास मंजुरी दिली. नवीन कायदेप्रणालीनुसार कलम १११ हे संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी अत्यंत कडक शिक्षेची तरतूद असणारे महत्त्वाचे कलम मानले जाते.

आरोपी सलीम रियाज कुरेशी व अतिक उर्फ सोनु रफिक कुरेशी यांच्याबाबत नागरिकांना काही माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ही कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाकडे व त्यांच्या पथकाने पार पाडली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 559
कलम १११ गुन्हेगारी संघटित गुन्हेगारी सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

By Annant Ppangarkar07/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: राजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शाळा व्यवस्थापन…

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

आज सोमवार, ०७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

07/09/2026

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.