Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026

रविवार विशेष लेख — हट्टी मोदींचे गर्वहरण!

July 26, 2026

आज, रविवार २६ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 26, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक
सामाजिक

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

व्हिक्टोरिया क्रॉस विजेते नामदेवराव जाधव हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान असून त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, यासाठी स्वराज्य सैनिक समिती सातत्याने पाठपुरावा करत होती.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 26, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झालेल्या प्रत्येक लढाईमध्ये भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य आणि त्याग दाखवला आहे. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर रात्रंदिवस पहारा देणाऱ्या सैनिकांमुळेच देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित आणि शांत झोपू शकतो. पाकिस्तानच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी कारगिल युद्धात मिळवलेला विजय हा आपल्या इतिहासातील अत्यंत सुवर्ण आणि महत्त्वाचा अध्याय आहे. या पराक्रमाचे आणि हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण कायम राहावे, यासाठी संगमनेरमध्ये राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक उभारले जाईल. या स्मारकासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने वेल्हाळे परिसरातील ४२ गुंठे जागा देण्यात येत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली.
संगमनेरमध्ये स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रामहरी कातोरे, मेजर भाऊसाहेब पोखरकर, तालुकाध्यक्ष प्रकाश कोटकर, कॅप्टन सुभाष कुडेकर, सुनील थोरात, प्रा. बाबा खरात, किसनभाऊ हासे, जितेश लोढा, युवराज गांजवे आणि रोहिणी कोटकर यांच्यासह स्वराज्य सैनिक कल्याण समितीचे विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानी सैनिकांनी डोंगराळ आणि उंच भागांवर ताबा मिळवला होता. अत्यंत प्रतिकूल हवामान आणि खालून वरच्या दिशेने लढावे लागण्याच्या कठीण परिस्थितीतही भारतीय सैन्याने आपल्या असीम धैर्याच्या जोरावर विजयश्री मिळवली. हा विजय संपूर्ण देशासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धापासून ते स्वातंत्र्यानंतरच्या पाकिस्तान व चीनविरुद्धच्या युद्धांपर्यंत भारतीय सैन्याने नेहमीच शौर्याची पराकाष्ठा केली आहे. व्हिक्टोरिया क्रॉस विजेते नामदेवराव जाधव हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान असून त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, यासाठी स्वराज्य सैनिक समिती सातत्याने पाठपुरावा करत होती. या स्मारकाच्या माध्यमातून भावी पिढीला देशभक्तीची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच स्वराज्य सैनिक कल्याण समितीने वीरमाता आणि वीरपत्नींच्या कल्याणासाठी केलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, देशाची एकात्मता आणि अखंडता कायम ठेवण्यात सैनिकांचे योगदान अनन्यसाधारण आहे. समाज म्हणून आपण सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबांचा सदैव सन्मान केला पाहिजे. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने स्मारकासाठी ४२ गुंठे जागा देऊन सामाजिक बांधीलकीचे उत्तम उदाहरण मांडले. याप्रसंगी भानुदास पोखरकर, प्रा. बाबा खरात व सुभाष कुडेकर यांचीही भाषणे झाली.
कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मालपाणी लॉन्स अशी भव्य रॅली काढली होती. ‘वंदे मातरम’ आणि ‘जय जवान, जय किसान’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश कोटकर यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र जोशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सुनील थोरात यांनी मानले. या सोहळ्याला तालुक्यातील सैनिक कुटुंबीय, महिला, नागरिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वीरमाता, वीरपत्नी आणि समाजभूषण हरिभाऊ उगले यांचा विशेष गौरव
या सोहळ्यात संत गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा चालवत स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणाऱ्या डोंगरगाव येथील हरिभाऊ उगले यांना बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मानपत्र आणि ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर जवानांच्या वीरपत्नी श्रीमती वैशाली बडे, श्रीमती वर्षा घोडेकर, श्रीमती सुरेखा पवार, श्रीमती मनीषा गुंजाळ, श्रीमती मंगल वलटे, श्रीमती सिंधुताई मनसुख आणि वीरमाता लहानुबाई ढगे यांना सन्मानचिन्ह देऊन भावूक वातावरणात गौरवण्यात आले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 147
घोषणा जागा नामदेवराव जाधव स्मारक बाळासाहेब थोरात सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने संगमनेरात शेतकऱ्यांचा दीड तासांचा महामार्ग रोको मागे शासकीय बफर स्टॉकमधून युरिया मिळताच आंदोलन स्थगनावर शिक्कामोर्तब; लिंकिंग आणि ढिसाळ नियोजनावरून महायुती सरकारवर कडाडून टीका

July 21, 2026

‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीत प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला स्थानिक व्यावसायिकांचा तीव्र विरोध; आमदार अमोल खताळ यांना निवेदन

July 14, 2026

दंडकारण्य अभियानांतर्गत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा; वृक्ष संगोपन हीच खरी ईश्वर सेवा: माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे आवाहन

July 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

By अनंत पांगारकरJuly 26, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झालेल्या प्रत्येक लढाईमध्ये भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य…

रविवार विशेष लेख — हट्टी मोदींचे गर्वहरण!

July 26, 2026

आज, रविवार २६ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 26, 2026

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.