Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

कृष्णाच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच थोरात यांनी सोशल मीडियावरून शोक व्यक्त केला होता आणि स्थानिक कार्यकर्त्यांना व यंत्रणेला पवार कुटुंबाच्या मदतीसाठी तातडीने पोहोचण्याच्या सूचना दिल्या होत्या.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन:

जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. सध्या ग्रामीण भागात बिबट्यांचे वाढते हल्ले व दहशत अत्यंत चिंताजनक असून, यावर वनविभाग आणि प्रशासनाने तातडीने व कायमस्वरूपी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

जळगाव, धुळे, पुणे आणि नाशिक दौऱ्यावरून परतल्यानंतर आमदार थोरात यांनी तातडीने जवळेकडलग येथे जाऊन वसंत पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांनी पवार कुटुंबीयांचे सांत्वन करत घरातील सदस्यांची आपुलकीने चौकशी केली व संपूर्ण कुटुंबाला धीर दिला. कृष्णाच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच थोरात यांनी सोशल मीडियावरून शोक व्यक्त केला होता आणि स्थानिक कार्यकर्त्यांना व यंत्रणेला पवार कुटुंबाच्या मदतीसाठी तातडीने पोहोचण्याच्या सूचना दिल्या होत्या.

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ग्रामीण भागात नागरिक, शेतकरी आणि विशेषतः शालेय विद्यार्थी बिबट्याच्या दहशतीखाली जगत आहेत. रात्रीच्या वेळी शेताला पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना आणि शाळेत जाणाऱ्या पाल्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. आपल्या भागात वस्त्यांवर नागरिकांचे वास्तव अधिक असल्याने भीतीचे वातावरण जास्त आहे. याप्रकरणी आपण शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला असून, वनविभागाची उदासीनता चिंताजनक आहे. प्रशासनाने अधिक सतर्क राहून उपाययोजना केल्या पाहिजेत, तसेच संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेततळ्यांच्या भोवती सुरक्षेसाठी संरक्षक जाळी बसवून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या सांत्वन भेटीदरम्यान गावातील दुसरी घटना असल्याने प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाटळ, गुलाबराव देशमुख, राजेंद्र कडलग, गिरीश सुर्वे, नानासाहेब वामन, उत्तम सुर्वे, संजय देशमुख, सुरेश कडलग, दत्ता कडलग, गणेश कडलग, सुमित देशमुख, सौरभ कडलग, चेतन देशमुख यांच्यासह गावातील ग्रामस्थ, पदाधिकारी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 728
जवळे कडलग बाळासाहेब थोरात सांत्वन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.