Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी स्पष्ट केले की, तरुणांचे प्रश्न, चिंता आणि त्यांच्या आकांक्षा थेट ऐकून घेणे हा या टाउनहॉलचा मुख्य उद्देश आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –

फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा समजून घेण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीने ‘जय भीम Gen-Z’ या नव्या टाउनहॉल मालिकेचा टीझर शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केला. 

भारतातील लोकसंख्येत Gen-Z पिढीचा वाटा एक चतुर्थांशपेक्षा अधिक असल्याने, या नवीन राजकीय व सामाजिक घटकाला थेट जोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

टीझरसोबत प्रसिद्ध केलेल्या संदेशात पक्षाने म्हटले आहे की, फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेच्या तरुण पिढीसोबत संवाद साधण्यासाठी ही टाउनहॉल मालिका आयोजित करण्यात येत आहे. टीझरमध्ये या मालिकेचा अधिक तपशील देण्यात आलेला नसून ‘लवकरच येत आहे’ असा उल्लेख करण्यात आला आहे. टाउनहॉल बैठकीच्या माध्यमातून नागरिक आणि राजकीय नेते यांच्यात थेट संवाद घडवून आणला जातो. त्यामुळे या उपक्रमाद्वारे Gen-Z सोबत राजकारण, शिक्षण, सामाजिक न्याय आणि फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर थेट खुली चर्चा घडवून आणण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

या उपक्रमाबाबत माहिती देताना वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी स्पष्ट केले की, तरुणांचे प्रश्न, चिंता आणि त्यांच्या आकांक्षा थेट ऐकून घेणे हा या टाउनहॉलचा मुख्य उद्देश आहे. पक्षाने नेहमीच विद्यार्थ्यांचे प्रश्न धसास लावले आहेत. नुकत्याच झालेल्या MAHA-TET पेपरफुटीप्रकरणी पक्षाची विद्यार्थी संघटना ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’ने आक्रमक भूमिका घेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांना उत्तरदायी ठरवले होते.

तसेच दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात पक्षप्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी पुकारलेला महाराष्ट्र बंद यशस्वी ठरला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली.

विद्यार्थी आणि तरुणांच्या वाढत्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक प्रचारापलीकडे जाऊन तरुणांशी संवादात्मक पद्धतीने जोडले जाणे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून Gen-Z च्या दैनंदिन समस्या आणि भविष्यातील आव्हानांवर थेट संवाद साधण्याचे एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या टाउनहॉल मालिकेच्या तारखा, ठिकाणे आणि सहभागी नेत्यांची नावे लवकरच जाहीर केली जाणार आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 67
उत्कर्षा रूपवते टीझर वंचित बहुजन आघाडी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.