Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

लोहारे येथील आवजीनाथ बाबा देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते २० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

22/10/2026

आज गुरुवार, २२ ऑक्टोंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य जाणून घ्या

22/10/2026

बाळासाहेब थोरातांचा राज्य सरकारला मोठा इशारा: ‘कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात तातडीने चारा छावण्या सुरू करा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल!’

21/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लोहारे येथील आवजीनाथ बाबा देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते २० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण
राजकारण

लोहारे येथील आवजीनाथ बाबा देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते २० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

गतवर्षी हिवरगाव पावसा येथील देवगड देवस्थानाला 'ब' वर्ग दर्जा मिळवून दिला असून, यावर्षी किमान तीन आणि पुढील वर्षी किमान पाच देवस्थानांना 'ब' वर्ग दर्जा मिळवून देण्याचा आपला मानस असल्याचे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/10/2026Updated:22/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील जागृत आणि सर्व समाजासाठी प्रेरणास्थान असलेल्या श्री आवजीनाथ बाबा देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे.
लोहारे येथे आवजीनाथ बाबा यात्रा उत्सवानिमित्त दर्शन घेतल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी आमदार खताळ यांच्या हस्ते २० लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण उत्साहात पार पडले.
खताळ म्हणाले, लोहारे येथील आवजीनाथ बाबा देवस्थान हे भाविकांच्या श्रद्धेचे मोठे केंद्र असून सध्या या देवस्थानाचा समावेश ‘क’ वर्गात आहे. त्याला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्यास राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर विकासनिधी उपलब्ध होण्यास मदत होईल, यामुळे मंदिराचा नियोजनबद्ध विकास करणे सोपे जाईल.
गतवर्षी हिवरगाव पावसा येथील देवगड देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून दिला असून, यावर्षी किमान तीन आणि पुढील वर्षी किमान पाच देवस्थानांना ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्याचा आपला मानस असल्याचे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले.
देवस्थानच्या विकासासाठी पर्यटनाच्या माध्यमातून २० लाखांचा निधी दिला असला तरी केवळ निधी देणे पुरेसे नसून कामांचा दर्जा व गुणवत्ता उत्तम असणे अत्यंत गरजेचे आहे. भूतकाळातील अनुभवांबाबत कोणीही निराश न होता ग्रामस्थ व विश्वस्तांनी पुढाकार घेऊन पाठपुरावा करावा, आपल्या कार्यकाळात कोणाचीही निराशा होणार नाही आणि विकासासाठी आपण ठामपणे पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
शिवसेनेच्या माध्यमातून मतदारसंघातील विद्यार्थिनी व महिलांसाठी विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघातील शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी ५०० सायकली आणि महिलांच्या रोजगारासाठी ५०० शिलाई मशिन उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला आहे. यामुळे विद्यार्थिनींची शाळेतील ये-जा सोपी होईल, तर महिलांना स्वयंरोजगारातून स्वावलंबी होण्यास मदत मिळेल. तसेच, दुष्काळात फक्त शासनावर अवलंबून न राहता संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना समाजानेही मदतीचा हात देऊन पुन्हा उभे केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास चंद्रकांत कर्पे, ॲड. गोरक्ष कापकर, भास्कर मुर्तडक, घनश्याम भास्कर, ॲड. शरद कापकर, नवनाथ जोंधळे, गणेश वराडे, राहुल आहेर, सुदर्शन पोकळे, राहुल महाराज पोकळे, शरद येलमामे, शरद मुर्तडक, नवनाथ कानकाटे, शंकर रनमाळे यांच्यासह आवजीनाथ बाबा मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, शिवसेना-महायुतीचे स्थानिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 37
अमोल खताळ निधी लोहारे देवस्थान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बाळासाहेब थोरातांचा राज्य सरकारला मोठा इशारा: ‘कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात तातडीने चारा छावण्या सुरू करा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल!’

21/10/2026

संगमनेरात विजयादशमीला आरएसएसचे पथसंचलन! स्वयंसेवकांच्या रुपात आमदार अमोल खताळ पाटलांची एन्ट्री

20/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

लोहारे येथील आवजीनाथ बाबा देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते २० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

By Annant Ppangarkar22/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील जागृत आणि सर्व समाजासाठी प्रेरणास्थान असलेल्या श्री…

आज गुरुवार, २२ ऑक्टोंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य जाणून घ्या

22/10/2026

बाळासाहेब थोरातांचा राज्य सरकारला मोठा इशारा: ‘कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात तातडीने चारा छावण्या सुरू करा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल!’

21/10/2026

संगमनेरमध्ये जनसागर! ३६ फुटी रावणदहन अन् हजारो झाडांचे वाटप; मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये ‘सीमोल्लंघन’चा उत्साह

21/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.