आजच्या दिवसाचे राशिभविष्य-
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी जुळवून घ्यावे. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. धार्मिक ग्रंथांच्या वाचनात वेळ जाईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
वृषभ – आजचा दिवस खर्च आणि आराम यांच्यात संतुलन राखण्याचा आहे. आरोग्याची काळजी घ्यावी, विशेषतः पोटाची जुनी तक्रार डोके वर काढू शकते. मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवावा लागेल. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवावा.
मिथुन – आज मित्रांकडून आणि ओळखीच्या व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेलेधन हाती येऊ शकते. मुलांच्या अभ्यासामुळे काहीशी चिंता वाढू शकते. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि कागदपत्रे वाचून स्वाक्षरी करा.
कर्क – आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ फलदायी राहणार आहे. कार्यालयीन कामात तुमचा मान-सन्मान वाढेल. अधिकारी वर्गाकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यापारात ग्राहकांची संख्या वाढल्यामुळे आर्थिक लाभ होईल. घरगुती प्रश्न शांतपणे सोडवावेत.
सिंह – आजचा दिवस मेहनत आणि संवादाचा असणार आहे. धार्मिक कार्यात मन रमल्यामुळे मानसिक शांती लाभेल. शरीरात थोडा थकवा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. कोणत्याही महत्त्वाच्या कामात घाईगडबड करणे टाळावे. वडीलधाऱ्या मंडळींच्या आशीर्वादाने महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
कन्या – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. मुलांच्या यशाने मनाला आनंद होईल. कार्यालयीन कामात सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या बाबतीत कोणतीही कुचराई करू नका. घरातील गोष्टी बाहेर उघड करू नका. विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता राहील.
तूळ – आजचा दिवस प्रगतीच्या नवीन संधी घेऊन आला आहे. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होऊ शकतो. अभियंत्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आजचा काळ अनुकूल आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि शांत राहील.
वृश्चिक – आजचा दिवस आनंददायक आणि यश देणारा आहे. उच्च अधिकारी वर्गाकडून तुमच्या कामाची स्तुति होईल. मनासारख्या ठिकाणी बदली किंवा पदोन्नतीची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. जोडीदाराची पूर्ण साथ लाभेल.
धनु – आज तुमचे सर्व कार्यालयीन काम वेळेत पूर्ण होईल. कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष यश मिळेल. महिला वर्ग कामात व्यस्त राहील. नवीन क्षेत्रात किंवा व्यवसायात सहभागी होण्याची सुवर्णसंधी प्राप्त होईल. प्रवास घडण्याची शक्यता आहे.
मकर – आजचा दिवस ऊर्जेने आणि उत्साहाने भरलेला असेल. अविवाहित व्यक्तींसाठी विवाहाचे उत्तम प्रस्ताव येऊ शकतात. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल आणि भविष्यात चांगला परतावा मिळेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील.
कुंभ – आज लोकांच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील, ज्या तुम्ही पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थी वर्गाला काही मोठी कामगिरी बजावता येईल. जिद्दी स्वभाव आणि राग यामुळे नुकसान होऊ शकते, त्यामुळे संयम ठेवा. वैवाहिक जीवन सुखद राहील.
मीन – आजचा दिवस संमिश्र फळे देणारा आहे. आरोग्याविषयी विशेष काळजी घ्यावी आणि बाहेरील किंवा जंक फूड खाणे टाळावे. मित्रांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य आणि भावनिक आधार मिळेल. आर्थिक उलाढाल करताना सावधगिरी बाळगावी.






