Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विखे-पिचडांसोबतची जवळीक भोवली; पक्षप्रमुखांनी पदच काढून घेतले
राजकारण

विखे-पिचडांसोबतची जवळीक भोवली; पक्षप्रमुखांनी पदच काढून घेतले

शिवसेना तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांची पदावरून गच्छंती!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

शिवसेनेत राहून देखील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांच्याशी सलगी ठेवणाऱ्या तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांची तालुकाध्यक्षपदावरून गच्छंती करण्यात आली आहे. आहेर यांच्या जागेवर उपजिल्हाप्रमुख असलेल्या भाऊसाहेब हासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून एक मोठा गट घेऊन बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचे दोन गटात विभाजन झाले. त्यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने हा लढा थेट न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव देखील तात्पुरत्या स्वरूपात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गोठविले गेल्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते देखील दोन गटात विभागले गेले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना अशा दोन गटात शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची विभागणी झाल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटत होते. त्यामुळे दोन्ही गटाकडून शिवसेनेची नव्याने बांधणी केली जात आहे या पार्श्वभूमीवर या निवडींना महत्त्व आहे.

आहेर यांच्याविषयी अनेकदा तक्रारी करून देखील पक्षांतर्गत आश्रयामुळे दखल घेतली जात नव्हती आता मात्र अचानकपणे त्यांना पदावरून हटविण्यात आले आहे.

मध्यंतरीच्या काळात आहेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला होता. मात्र पक्षातील काही लोकांच्या आश्रयामुळे तो स्वीकारला गेला नव्हता. तसेच आहेर यांची महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभव पिचड या भाजपातील नेत्यांसोबत आहेर यांची वाढती सलगी लक्षात घेत त्यांच्या विरोधात अनेक कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी देखील केल्या होत्या. शिवसेनेत असलेले आहेर नेमके कोणत्या पक्षात आहेत, याविषयी देखील चर्चा होत असत. आहेर केवळ तालुकाप्रमुखच नव्हते तर राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे एकेकाळचे प्रतिस्पर्धी उमेदवार देखील होते या निवडणुकीत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

आहेर यांचे शिवसेनेत वरिष्ठ नेत्यांसोबत देखील सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रारी येऊन देखील त्यांना पक्षात नेहमीच अभय मिळत गेले.

शनिवारी शिवसेनेच्या अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’ मधून जाहीर करण्यात आली आहे. यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी नवे पदाधिकारी देण्यात आले आहेत. संगमनेरात देखील काही पदाधिकाऱ्यांचा खांदेपालट करण्यात आला आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे तत्कालीन तालुकाप्रमुखांविरोधात तक्रारी करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांसोबत् नुकताच संवाद साधला होता यावेळी देखील या पदाधिकाऱ्यांसोबत आहे उपस्थित होते. पदावरून गच्छंती झाल्यानंतर जनार्दन आहेर आणि त्यांचे समर्थक आता काय निर्णय घेता येत याकडे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 167
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.