Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवभोजन थाळी सुरू राहणार; मात्र राज्यभरात होणार ऑडिट
सामाजिक

शिवभोजन थाळी सुरू राहणार; मात्र राज्यभरात होणार ऑडिट

शिंदे गटाच्या प्रवेशानंतर खासदार लोखंडे यांच्या दौऱ्ययशदा आणि टिस संस्था करणार राज्यात ऑडिट
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

राज्यात सत्तारूढ झालेल्या शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडका लावला असताना गरिबासाठी अन्नदात्री ठरलेली शिवभोजन थाळी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्यभरात या थाळ्यांचे यशदा आणि टीस या दोन संस्थांमार्फत ऑडिट केले जाणार आहे.

नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर आधीच्या सरकारांच्या निर्णयांना जशी स्थगिती मिळाली तशाच पद्धतीने शिवभोजन थाळी देखील बंद केली जाण्याची चिन्हे होती. मात्र सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवभोजन थाळी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

शिवभोजन थाळी सुरू ठेवण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री शिवभोजन थाळीचा आढावा घेणार आहेत. तसेच राज्यभरात यशोदा आणि टिस संस्था या संदर्भात ऑडिट करतील.

राज्य सरकारकडून शिवभोजन केंद्र चालकांना अनुदान दिले जात होते. ग्रामीण भागातील केंद्रचालकांना एका थाळीमागे 50 रुपये आणि शहरी भागातील थाळी चालकांना 35 रुपये अनुदान देण्यात येत होते. शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा संशय आहे. त्यामुळे ही योजना बंद होणार असल्याची चर्चा सुरू होती. या योजनेतंर्गत राज्यातील जनतेला 10 रुपयांत जेवण मिळते. कोरोना काळात याची किंमत 5 रुपये करण्यात आली होती.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. राज्यात 1 लाख 88 हजार 463 एवढ्या थाळ्यांची विक्री होते. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून विविध मदत दिली जाते. 

 

अशी आहे शिवभोजन थाळी योजना

गरिबांना, गरजूंना सहज व अत्यल्प दरात भोजन उपलब्ध करण्यासाठी राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले होते. शिवभोजन थाळी केंद्र स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, हॉटेल चालक आदींना चालवण्यासाठी देण्यात आली आहेत. शिवभोजन थाळी केंद्र चालकांना राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येते. शिवभोजन थाळीत एक वाटी भाजी, दोन चपात्या, भात व वरणाचा समावेश आहे.

संगमनेरात या थाळीला वाढदिवसाची गोडी

संगमनेर मधील शिव भोजन केंद्रात या थाळीला वाढदिवसाची गोडी प्राप्त झाली आहे. संगमनेर मधील मान्यवर त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दीड हजार रुपये देऊन वाढदिवस साजरा करत असतात या पैशातून येणाऱ्या सर्वांना जेवण मोफत दिले जाते या थाळीमध्ये एक गोड पदार्थ दिला जातो. त्यामुळे शिवभोजन थाळी सोबत येथे स्वीट डिशदेखील मिळत असते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 100
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.