Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाजप क्रीडा संकुलाचे करणार नामांतर; पालिकेत सत्ता आल्यास ‘छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल’ नांव देणार : माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार
राजकारण

भाजप क्रीडा संकुलाचे करणार नामांतर; पालिकेत सत्ता आल्यास ‘छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल’ नांव देणार : माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार

सत्ताधाऱ्यांनी खासगी मालमत्ता समजून क्रीडा संकुलाचा उपयोग केला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

रस्त्यातील खड्ड्यांपाठोपाठ आता भाजपने क्रीडा संकुलाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. नगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यास सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलाचे नांव बदलून ते ‘छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल’ असे केले जाणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे नेते जावेद जहागिरदार यांनी दिली.

जहागिरदार म्हणाले, संगमनेर नगरपालिकेत ३० वर्षांपासून माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अधिपत्याखाली कॉग्रेसची सत्ता आहे. त्यावेळी मोठा गाजावाजा करत नगरपालिकेने सुमारे पाच एकर परिसरामध्ये क्रीडा संकुलाची उभारणी केली आहे. यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला. संगमनेर नगरपालिकेचे क्रीडा संकुल ही शासकीय मालमत्ता आहे. ते शासकीय निधीतून उभे राहीले आहे. या संकुलाला सत्ताधाऱ्यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल असे नांव दिले आहे.

क्रीडा संकुलाचा फायदा संगमनेरमधील खेळाडूंना होईल, या मैदानावर मोठमोठ्या स्पर्धा भरविण्यात येतील, असे त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी सांगीतले होते. प्रत्यक्षात मात्र तसे काहीही घडतांना दिसत नाही. युवक कॉग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेचा अपवाद वगळता सामान्य क्रीडा पट्टुंसाठी या क्रीडा संकुलाचा फारसा उपयोग होत नाही. याशिवाय या क्रीडा संकुलापासून नगरपालिकेला फारसे उत्पन्नदेखील मिळत नाही. येत्या काळात या क्रीडा संकुलाचा सामान्य खेळाडुंना उपयोग व्हावा, यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. सत्ताधाऱ्यांनी आपली खासगी मालमत्ता समजुन या क्रीडा संकुलाचा उपयोग केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

थोरात यांच्या नावाबद्दल आम्हाला आदर आहे, मात्र सत्ताधाऱ्यांनी हे नांव शासकीय मालमत्तेला देण्याऐवजी ते खासगी मालमत्ता अथवा एखाद्या संस्थेला द्यावे, असे सांगत आगामी पालिका निवडणुकीत संगमनेरकरांनी भारतीय जनता पक्षाला कौल दिल्यास या क्रीडा संकुलाचे नांव बदलून ते ‘छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल’ केले जाईल, असे जहागिरदार यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 108
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात…

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.