Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आम्ही सुरक्षेविना फिरतो, हिंमत असेल तर तुम्ही सुरक्षेविना फिरून दाखवा! खासदार संजय राऊत यांचा शिंदे गटावर हल्लाबोल
राजकारण

आम्ही सुरक्षेविना फिरतो, हिंमत असेल तर तुम्ही सुरक्षेविना फिरून दाखवा! खासदार संजय राऊत यांचा शिंदे गटावर हल्लाबोल

गद्दारीचा शिक्का बंडखोरांच्या कपाळावर बसलाय
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

आज सत्ता असल्यानं तुमच्याकडे सुरक्षा व्यवस्था आहे. तुम्ही आमची सुरक्षा काढली. आम्ही एकटं फिरतोय मर्दासारखं. आम्ही म्हणतो का सुरक्षा द्या म्हणून? आम्हाला कोणी हात लावतंय का? तुम्हीदेखील सुरक्षेशिवाय फिरण्याची हिंमत दाखवा. तुम्ही सुरक्षेत फिरताय याचा अर्थ तुम्हाला भीती आहे. जनता खवळलेली आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आले या दौऱ्या दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एकनाथ शिंदे गटावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. हिंमत असेल तर सुरक्षेविना फिरून दाखवा, असा इशाराच त्यांनी बंडखोरांना दिला आहे. आम्ही बघा सुरक्षेविना बिनधासत्पणे फिरू शकतोय, असंही ते म्हणाले.

गद्दारांपैकी कोण काय बोलतंय याचं मला काही पडलेलं नाही. ४० नेते गेले असले तरी पक्ष तिथंच आहे. पालापाचोळा उडून गेल्यानं शिवसेनेला फरक पडत नाही. तुम्ही कितीही खोके द्या. जनता खोक्याला विकली जात नाही हे लक्षात ठेवा.

मी गद्दार किंवा खोकेवाल्यासांठी पत्रकार परिषद घेतली नाही. यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. जसं दिवार सिनेमात अमिताभच्या हातावर गोंदलं होतं, मेरा बाप चोर है, तसं यांचे नातेवाईक, यांचे पोरं यांच्या बायका यांना उद्या लोकं म्हणतील हे गद्दारांचे नातेवाईक आहेत. त्यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. यांच्या पिढ्या न पिढ्यांना ही गद्दारी शांतपणे बसू देणार नाही.

जे आमदार खासदार शिवसेनेतून बाहेर पडले आहे त्यांनी, पुन्हा निवडून येऊन दाखवावे. नारायण राणे यांना मी महत्त्व देत नसून त्यांच्यावर बोलण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पाणी सोडले, त्या चुल्लूभर पाण्यात मुख्यमंत्र्यांनी डूबून मरावे. शेजारच्या राज्यातील मुख्यमंत्री तुम्हाला डिवचत आहे. असं अतिक्रमण याआधी कधीही झालेलं नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज सरकारला आव्हान देत आहेत. आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान असा सवाल त्यांनी बंडखोर शिंदे गटाला केला.

याच स्वाभिमानाचा मुद्द्यावर तुम्ही शिवसेना सोडलीय ना, आता शिवरायांचा अपमान होतोय तर मग तुम्ही शांत का? असा सवाल करत त्यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर त्यांनी आक्रमकपणे आपली मते मांडली.

शिंदे गटात होणार मोठा स्फोट

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये शिंदे गटात मोठा स्फोट होणार असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, मी खासदार असलो तरी त्या अगोदर एक क्राईम रिपोर्टर आहे. माझा पिंड पत्रकाराचा आहे. त्यामुळे कोणाच्या डोक्यात काय सुरू आहे, ते मला चांगलं समजतं. शिंदे गटात काय सुरू आहे हे मला माहिती आहे त्याचा लवकरच स्फोट होईल असं देखील ते म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 128
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.