Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिरपेचात मानाचा तुरा; ‘एसएमबीटी’ने जायफळापासून बनविले वेदनाशामक जेल
महाराष्ट्र संवाद विशेष

शिरपेचात मानाचा तुरा; ‘एसएमबीटी’ने जायफळापासून बनविले वेदनाशामक जेल

इतर जेलच्या तुलनेत किंमतही कमी असणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार विशेष

एसएमबीटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश उशीर व प्रा. डॉ. सुदर्शन सिंग यांच्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे. या पेटंटचे पुढील २० वर्षांपर्यंत ‘एसएमबीटी’कडे अधिकार राहणार आहेत. या संशोधनामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा शरीरावर सूज येणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लहानपणी घरातील वृध्द आजीबाई काही दुखत असल्यास जायफळ व तेल यांचे मिश्रण शरीरावर लावत असे. त्याच संकल्पनेतून जायफळात नेमके काय असावे? याचा शोध डॉ. उशीर व त्यांच्या समूहाने घेतला. अनेक वर्षे बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास सुरु होता. दरम्यान, जायफळात अशी काही गुणसत्व आहेत जी वेदनाशामक असून शरीराचे दुखणे कमी करण्यास रामबाण उपाय ठरू शकतात, असे निदर्शनास आले.

जायफळ वेदनाशामक औषध असून इतर वेदनाशामक औषधांनादेखील ते बुस्टर म्हणून काम करू शकणारे आहे. या औषधाच्या अनेक चाचण्या झाल्या यासोबतच गुणवत्तेचीदेखील पडताळणी करण्यात आली. या प्रकारातील संशोधन यापूर्वी कुठेही झालेले नाही असेही पटवून देण्यात आले. या औषधाच्या उत्पादनासाठीची यंत्रणा कशी काम करणार? तसेच अधिक प्रमाणात उत्पादन घ्यावयाचे असल्यास काय करावे? पेटंट नोंदणी झाल्यानंतर औषधाला सर्वसामान्य रुग्णांपर्यंत कशाप्रकारे पोहोचवावयाचे याबाबतचा सखोल अभ्यास करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हर्बल प्रकारात हे प्रोडक्ट मोडणार आहे. अनेक नागरिकांना वयोमानानुसार, गुडघेदुखीचा त्रास असतो, शरीरावर सूज येते, सांधेदुखी सारख्या असह्य आजारांचा त्रास होत असतो. बाजारातील अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मलमांमुळे फरक न पडलेल्या रुग्णांना या माध्यमातून चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. साईड इफेक्टस टाळण्यासाठी आता बहुतांश नागरिक आयुर्वेदाकडे वळले आहेत. त्यामुळे हा जेल रामबाण उपाय म्हणून काम करणार यात शंका नाही.

आंतरराष्ट्रीय औषध निर्मिती परिषदांमध्ये एसएमबीटी फार्मसीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये नेपाळ, थायलंड, इंडोनेशिया व मलेशिया या देशांत प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी मिळाली आहे. इतर देशातील अनेक तज्ज्ञ यानिमित्ताने एसएमबीटीशी जोडले गेले आहेत. अभ्यासपूर्ण केलेल्या संशोधनामुळे डॉ. उशीर यांच्यासह एसएमबीटीमधील सहकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एसएमबीटी व्यवस्थापना कडून या सर्व टीमचे अभिनंदन करण्यात आले आहे.
नाशिकमधील एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी महाविद्यालयात अनेक नवनवीन संशोधनांवर काम सुरु आहे. यातील पहिल्या प्रयत्नाला यश आले आहे. येणाऱ्या काळात आणखी काही पेटंट आपणास मिळतील. या जेलचा उपयोग सर्वसामान्य रुग्णांना होणार असून इतर वेदनाशामक जेलच्या तुलनेत या जेलची किंमत कमी राहण्याची शक्यता आहे.

डॉ. योगेश उशीर, प्राचार्य.

एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 115
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.