Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गाव कारभारी ठरले; संगमनेरात माजी मंत्री बाळासाहेब थोरातच किल्लेदार
राजकारण

गाव कारभारी ठरले; संगमनेरात माजी मंत्री बाळासाहेब थोरातच किल्लेदार

मंत्री विखे गटानेही आपला करिष्मा दाखवत मिळविले मोठे यश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/12/2022No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

३७ पैकी थोरात गटाचे २६, विखे गटाचे ९ तर २ ठिकाणी अपक्ष सरपंच

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर तालुक्यामध्ये रविवारी ३७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. मंगळवारी झालेल्या मतमोजणीनंतर तालुक्याचे गाव कारभारी स्पष्ट झाले. तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही संगमनेरची निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने नऊ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदी त्यांच्या गटाच्या उमेदवारांना यश मिळाले आहे.

मतमोजणीनंतर मिळालेल्या माहितीनुसार 37 पैकी 26 ग्रामपंचायतीमध्ये राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाचे, तर नऊ ग्रामपंचायतीमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आणि दोन ग्रामपंचायतीमध्ये अपक्ष सरपंचांनी बाजी मारली. विशेष म्हणजे अपक्ष निवडून आलेल्या दोन्हीही महिला आहेत. तर तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी झाले आहेत. काही ठिकाणी दोन्ही गटांनी एकमेकांना धक्का-प्रतिधक्का दिल्याचे बघावयास मिळाले.

संगमनेर तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर आजी-माजी महसूल मंत्र्यांमध्ये संघर्ष बघावयास मिळाला. राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत विशेष लक्ष घातल्याने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे गावासह तळेगाव, कनकापूर, कोल्हेवाडी, निंबाळे, निमोण, मालुंजे, रहीमपूर आणि सादतपूर येथील सरपंचपदी विखे गटाच्या जनसेवा मंडळाच्या उमेदवारांची वर्णी लागली असल्याची माहिती मिळते. तर महत्वपूर्ण असलेल्या घुलेवाडीसह निळवंडे येथील सरपंचपदी दोन्ही अपक्ष महिला विजयी झाल्या आहेत. निळवंडे येथे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या सासुबाई शशिकला पवार निवडून आल्या आहेत.

तर डोळासने व सायखिंडी येथे बिनविरोध निवडून आलेले सरपंच शेतकरी विकास मंडळाचे असून याशिवाय अंभोरे, उंबरी बाळापूर, ओझर खुर्द, करुले, कर्जुले पठार, कोळवाडे, खराडी, चिंचोली गुरव, चिकणी, जांबुत बुद्रुक, जांभूळवाडी, दरेवाडी, धांदरफळ खुर्द, धांदरफळ बुद्रुक, निमगाव भोजापूर, निमगाव जाळी, पिंपरणे, पोखरी हवेली, रणखांबवाडी, वडझरी खुर्द, वडझरी बुद्रुक, वाघापूर, साकुर आणि हंगेवाडी येथे शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार सरपंचपदी विजयी झाले आहेत. सरपंच आणि सदस्य पदी बहुतांशी ग्रामपंचायतीमध्ये थोरात गटाने वर्चस्व मिळविले असले तरी काही ग्रामपंचायती थोरात गटाकडून मिळविण्यात विखे गटाला यश आले आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने या निवडणुका महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आहेत.

असे आहेत नवे सरपंच

पिंपरणे : नारायण मरभळ (थोरात गट)

ओझर खुर्द : गिरिजा साबळे (थोरात गट)

निमोण : संदीप देशमुख (विखे गट)

अंभोरे : सुरेखा खेमनर (थोरात गट)

हंगेवाडी : कमल कांगणे (थोरात गट)

कनकापूर : ज्योती पाचपिंड (विखे गट)

निंबाळे : भगीरथाबाई काठे (विखे गट)

वडझरी बुद्रुक : संध्या गोरडे (थोरात गट)

वडझरी खुर्द : पांडुरंग सुपेकर (थोरात गट)

कोळवाडे : पुष्पा गुंजाळ (थोरात गट)

जांभुळवाडी : शांताबाई कुदनर (थोरात गट)

रणखांबवाडी : बाबाजी गुळवे (थोरात गट)

पोखरी हवेली : सुदाम खैरे (थोरात गट)

निमगाव भोजापूर : ज्योती कडलग (थोरात गट)

कोल्हेवाडी : सुवर्णा दिघे (विखे गट)

मालुंजे: सुवर्णा घुगे (विखे गट)

जोर्वे : प्रीती दिघे (विखे गट)

उंबरी बाळापुर: अर्चना भुसावळ (थोरात गट)

चिकणी : गायत्री माळी (थोरात गट)

सायखिंडी : नीलम पारधी (थोरात गट)

चिंचोली गुरव : विलास सोनवणे (थोरात गट)

निळवंडे : शशिकला पवार (अपक्ष)

कर्जुले पठार : रोहिणी भागवत (थोरात गट)

खराडी : ज्योती पवार (थोरात गट)

वाघापूर : स्मिता शिंदे (थोरात गट)

साकुर : सचिन सोनवणे (थोरात गट)

करुले : बाळासाहेब आहेर (थोरात गट)

सादतपूर : नारायण गुंजाळ (विखे गट)

रहिमपूर : सविता शिंदे (विखे गट)

तळेगाव दिघे : उषा दिघे (विखे गट)

डोळसणे : मंगल काकड (थोरात गट)

धांदरफळ बुद्रुक : उज्वला देशमाने (थोरात गट)

धांदरफळ खुर्द : लता खताळ (थोरात गट)

घुलेवाडी : निर्मला राऊत (अपक्ष)

निमगाव जाळी : प्रतिभा जोंधळे (थोरात गट)

दरेवाडी : आनंदा दरगुडे (थोरात गट)

जांबुत बुद्रुक : सोनाली शेटे (थोरात गट)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 141
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.