Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विधानसभा निवडणूक लढणारच पण … मामांच्या विरोधात नाही; सत्यजित तांबे स्पष्टच बोलले
राजकारण

विधानसभा निवडणूक लढणारच पण … मामांच्या विरोधात नाही; सत्यजित तांबे स्पष्टच बोलले

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

राजकारण परिस्थितीवर अवलंबून असते त्यामुळे कोठे जाऊन काम करू शकेल हे निश्चित नसले तरी 2024 ची विधानसभा निवडणूक आपण लढविणार आहोत पण मामांच्या विरोधात नाही, असे स्पष्टच सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे.

सत्यजित तांबे यांनी अनुवादित केलेल्या ‘सिटीझनविल’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना उद्देशून युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यावर भाजपची नजर असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

तांबे म्हणाले पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मंत्री आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्यासह प्रमुख पक्षाच्या प्रमुखांना बोलाविले होते मात्र मुख्यमंत्री व ठाकरे उपस्थित राहू शकले नाही. राजकारणा पलीकडे जाऊन एका अजेंठावर सर्वांनी एकत्र यावे ही यामागे भूमिका होती.

फडणवीस यांनी दिलेल्या ऑफर बद्दल विचारता ते म्हणाले, राजकारणात चांगल्या लोकांचा शोध असतोच. बाळासाहेब थोरात याबद्दल बोलले नसले तरी ते कृतीतून बोलतील असे स्पष्ट करत आम्हाला देखील सुषमा अंधारे काँग्रेसमध्ये असत्या तर आनंद झाला असता एक चांगला वक्ता पक्षाला मिळाला असता. असे ते म्हणाले

23 वर्ष पक्ष संघटनेत राज्य व देश पातळीवर वेगवेगळ्या पदावर काम केले आहे. यामुळे जे मला मिळायला हवे होते ते मला मिळाले नाही अशी माझ्या आसपासच्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची धारण आहे. मला देखील राज्य पातळीवर काम करणे महत्त्वाचे वाटते. विधान परिषद अथवा लोकसभेत जाण्यात मला रस नाही मात्र विधानसभेत मला काम करण्यास रस आहे. असे असले तरी राजकारण परिस्थितीवर अवलंबून असते.

चांगलं काम करण्यासाठी आमदार खासदारच झाले पाहिजे असेही गरजेचं नाही. राज्यात साडेतीनशे आमदार आहेत पण दहा नावे देखील सांगता येत नाहीत अशी परिस्थिती आहे. ठोस काम करण्यासाठी विधिमंडळ किंवा संसदीय मंडळासारखं दुसरं व्यासपीठ नाही.

संगमनेर अथवा शिर्डीतून निवडणूक लढविणार का असे विचारले असता सत्यजित तांबे स्पष्टच बोलले की, संगमनेर तालुक्यातील 28 गावे म्हणजेच जवळपास 60000 मतदान शिर्डी मतदार संघात गेले त्यावेळी शिर्डीतून लढण्यासाठी मी इच्छुक होतो. आता परिस्थिती बदलली आहे. संगमनेर मतदार संघ हा माझ्या मामाचा म्हणजेच बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ आहे त्यांच्या विरोधात लढण्याचा प्रश्नच येत नाही.

थोरात यांचा इंटरेस्ट जात आहे तो प्रथमता प्रोटेक्ट करायचा नंतरच आपलं राजकारण करावयाचं अशी आमच्या परिवाराची भूमिका आहे त्यामुळे यावरून आमच्यात कधी वाद झाले नाही आणि भविष्यात देखील होणार नाही. मात्र 2024 ची विधानसभा निवडणूक आपण शंभर टक्के लढणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तांबे येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार याबाबत उत्सुकता आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 125
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याच्या अत्यंत गंभीर आरोपाखाली गेली…

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.