Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार थोरात यांच्या पाठपुराव्यातून तालुक्यातील रस्त्यांसाठी तीन कोटीचा निधी
सामाजिक

आमदार थोरात यांच्या पाठपुराव्यातून तालुक्यातील रस्त्यांसाठी तीन कोटीचा निधी

प्रस्तावित कामात संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांचा समावेश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/01/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या रस्त्यांच्या विविध कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तब्बल तीन कोटी दहा लाख रुपयांचा निधी संगमनेर तालुक्यासाठी मंजूर झाला आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते माजी महसूल मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

राज्य सरकारकडून थोरात यांनी मोठा निधी उपलब्ध करत तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर विविध विकासाच्या योजना राबविल्या आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून २०२२-२०२३ मधून येथील देखील तालुक्यासाठी तीन कोटी दहा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची व यातून तालुक्यातील विविध रस्त्यांची कामे केली जाणार असल्याची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली आहे.

१७१ गावे आणि २५० पेक्षा अधिक वाड्या वस्त्यांचा समावेश असलेल्या संगमनेर तालुक्यात थोरात यांनी विविध विकास कामे मार्गी लावली आहे.

आमदार थोरात यांच्या पाठपुराव्यातून होणारी ही कामे तातडीने सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे निमगाव जाळी, मांची हिल, गुंजाळवाडी, कासारा दुमाला, मंगळापुर, धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, सारोळे पठार, माळेगाव पठार कौठे बुद्रुक, चिंचोली गुरव, देवकौठे, रायतेवाडी, पेमगिरी, सावरचोळ, खांडगाव, तळेगाव, घुलेवाडी, सायखिंडी, सोनेवाडी, मालदाड, मनोली, निमोण, कऱ्हे, साई श्रद्धा चौक आदी परिसरातील नागरिकांनी थोरात यांचे आभार मानले आहेत.

या रस्त्यांच्या कामाचा आहे समावेश…

चिंचपूर मळई वस्ती ते प्रतापूर, निमगाव जाळी रस्ता मजबुतीकरण १५ लाख रुपये, पांढरी रस्ता ते मांची हिल रस्ता १५ लाख रुपये, घुलेवाडी एकता चौक ते साई श्रद्धा चौक रस्ता खडीकरण व डाबरीकरण १५ लाख रुपये, गुंजाळवाडी अरगडे मळा गेट ते गुंजाळवाडी चौफुली रस्ता मजबुतीकरण व डांबरी करण्यासाठी १० लाख रुपये, राष्ट्रीय महामार्ग ५० ते मंगळापूर कासार दुमाला रस्ता मजबुतीकरण व डांबरी करण्यासाठी १० लाख रुपये, राष्ट्रीय महामार्ग ५० ते करमाळा रस्ता मजबुती करण्यासाठी १५ लाख रुपये, कौठे धांदरफळ क्षीरसागर मळा ते सांगवी रस्ता डांबरीकरणासाठी १५ लाख रुपये, सारोळे पठार, धादवडवाडी, माळेगाव पठार रस्ता मजबुतीकरण १५ लाख रुपये, कौठे बुद्रुक ते पौसावाडी रस्ता १५ लाख रुपये, चिंचोली गुरव, वामनवाडी, बोडकेवाडी तळेगाव रस्ता १५ लाख रुपये, निमगाव खुर्द ते काशाई मंदिर डांबरीकरण करणे १० लाख रुपये, रायतेवाडी तनपुरे वस्ती ते दिघे वस्ती चौगुले पर्यंत रस्त्याची खडीकरण करणे १० लाख रुपये , मोरदरा, पेमगिरी येलूशी वाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी १५ लाख रुपये, खांडगाव ते ग्रामीण रस्ता मजबुतीकरण १० लाख रुपये, सावरचोळ ते चंदगड रस्ता १० लाख रुपये, मनोली ते शिंदेवस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे २० लाख रुपये, निमोन, क-हे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे २० लाख रुपये, तळेगाव ते घोडमाळ, देवकौठे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण २० लाख रुपये, घुलेवाडी ते खांजापूर रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे २० लाख रुपये, सायखिंडी रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग डाबरीकरण करणे २० लाख रुपये सोनेवाडी ते मालदाड रस्ता डांबरीकरण करणे १० लाख रुपये या कामांसाठी एकूण ३ कोटी १० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

निळवंडे कालव्यासाठी आमदार थोरात यांचाच पाठपुरावा…

आमदार बाळासाहेब थोरात यांनीच अनेक अडचणीवर मात करून निळवंडे धरण पूर्ण केले असून कालव्यांच्या कामासाठी त्यांनीच पाठपुरावा केला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वात जास्त निधी मिळवून देत ऑक्टोबर २०२२ मध्येच पाणी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात नेण्यासाठी रात्रंदिवस काम सुरू ठेवले होते, मात्र सरकार बदलले आणि सदर कामाला स्थगिती मिळाली. तरीही आमदार थोरात हेच या कालव्याच्या कामासाठी पाठपुरावा करत असून तेच शेतकऱ्यांना पाणी देतील असा विश्वास दुष्काळी भागातील नागरिकांना असल्याचे म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 114
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.