महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
छात्र भारती संघटना, परमपूज्य गगनगिरी विद्यालय आणि ग्रामपंचायतीच्यावतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातून रॅली देखील काढण्यात आली होती.
गावातील शाळेमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह महिला, गगनगिरी विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सर्वांनी गावातून काढलेली रॅली लक्षवेधी ठरली. विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल प्रेरणादायी घोषणा देण्यात आल्या.


