Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरचे परिचय सम्मेलन माहेश्वरी समाजाला वरदान : डॉ. वसंत बंग
सामाजिक

संगमनेरचे परिचय सम्मेलन माहेश्वरी समाजाला वरदान : डॉ. वसंत बंग

वधु-वर परिचय समेलनाची अकरा वर्ष; राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समुहाचा उपक्रम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/01/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी परिवाराच्या पुढाकाराने व महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा आणि संगमनेरमधील माहेश्वरी समाज यांच्या सहकार्याने आयोजित केले जाणारे विवाहयोग्य युवक-युवती परिचय संमेलन मागील दहा वर्षांपासून माहेश्वरी समाजाला वरदान ठरले आहे. हे संमेलन म्हणजे व्यवस्थापन कौशल्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण असल्याचे गौरवोद्गार प्रसिध्द व्यवस्थापन गुरु डॉ. वसंत बंग यांनी काढले.

अखिल भारतीय माहेश्वरी विवाहयोग्य युवक-युवती परिचय संमेलनाचा उद्घाटनावेळी ते बोलत होते. राजस्थान मंडळाचे अध्यक्ष मनिष मालपाणी, स्वागताध्यक्ष राजेश मालपाणी, उद्योजक विजय आसावा, अजय लाहोटी, मंडळाचे कार्याध्यक्ष रोहित मणियार, प्रकल्प प्रमुख ओम इंदाणी, उपाध्यक्ष सम्राट भंडारी, संगमनेर तालुका माहेश्वरी सभेचे अध्यक्ष अतुल झंवर, कोषाध्यक्ष उमेश कासट, सचिव आशीष राठी, प्रकल्प प्रमुख सागर मणियार आदी यावेळी मंचावर उपस्थित होते. संमेलनासाठी महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपर्‍यातून युवक-युवतींसह तीन हजाराहून अधिक समाजबांधव उपस्थित होते.

डॉ. बंग यांनी आपल्या भाषणात विवाह संबंधीत विविध मुद्द्यांचा प्रभावी रीतीने परामर्श घेतला. आजकाल विवाह जमविताना पॅकेज या गोष्टीला नको इतके जास्त महत्त्व दिले जात आहे. उद्योग, व्यवसायात अग्रेसर असलेला माहेश्वरी समाज प्रगतीशील आचार व विचारांचा समाज म्हणून नावलौकिक राखून आहे. त्यामुळे वैवाहिक नाती जुळविताना देखील नवीन दृष्टिकोन रुजविण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. विवाह ही अतिशय मंगल गोष्ट असताना आजकाल विवाह जमविणे ही समस्या का होऊन बसली याचा समाजाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. मनिष मालपाणी यांच्या संकल्पनेतून होणारे संमेलन उपवरांसाठी आशेचा किरण आहे. प्रत्येक वर्षी या संमेलनाला मिळणारा वाढता प्रतिसाद ही यशस्वीतेची मोठी पावती असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मनिष मालपाणी म्हणाले, पती हवा तर पुण्याचाच असा हट्ट केल्यामुळे अनेक मुलींच्या लग्नाचे वयं निघून जात आहे. संगमनेरसारख्या तालुका पातळीवर देखील जीवनमान सुखवस्तू आहे. मोठ्या शहरांचे विनाकारण आकर्षण बाळगणे बरोबर नाही. समंजसपणा हा संसाराचा पाया आहे. त्यामुळे आयुष्याचा जोडीदार शोधतांना मुले-मुली दोघांनीही अपेक्षांच्या सीमारेषा आखून घेतल्या पाहिजे. विवाह जमविण्याच्या समस्येची तीव्रता काही प्रमाणात तरी कमी करण्यात मागील दहा वर्षात आम्हाला यश आले आहे.

स्वागताध्यक्ष राजेश मालपाणी म्हणाले

येथील संमेलनात विवाह जुळण्यामागे ‘संगमनेर’ या नावाचाही महिमा असावा. त्यामुळेच येथे दोन परिवारांचा संगम होण्याचे योग येत असावेत. 

प्रमुख अतिथी उद्योजक विजयकुमार आसावा यांनी राजस्थान युवक मंडळाचे परिचय संमेलन म्हणजे जगन्नाथाचा रथ ओढण्याचे अथवा गोपालांनी गोवर्धन उचलावा असे कार्य असल्याचे सांगितले. यावेळी प्रिया लोहे, प्रियंका पोफळे, रश्मी करवा, मनीषा मणियार यांनी महेश वंदना सादर केली. रोहित मणियार यांनी प्रास्तविक केले. रचना मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमादरम्यान उपक्रमासाठी परिश्रम घेणार्‍या सुमित अट्टल, उमेश कासट, कैलास असावा, कल्याण कासट, द्वारकानाथ राठी, सुरेशचंद्र जाजू, श्रीमती चंद्रकलाबाई राठी, शालिनी मालपाणी, शांताबाई बजाज, मंगला आसावा, रामचंद्र जाजू, नंदकिशोर जाजू, कैलास राठी, मनोज साकी इत्यादी कार्यकर्त्यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला. कृष्णा आसावा यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला, सूत्रसंचालन आदित्य मालपाणी, महेश झंवर व व्यंकटेश लाहोटी यांनी सूत्रसंचालन तर सम्राट भंडारी यांनी आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 296
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.