Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहकाराच्या माध्यमातून संगमनेर समृद्ध : आमदार डॉ. सुधीर तांबे
सामाजिक

सहकाराच्या माध्यमातून संगमनेर समृद्ध : आमदार डॉ. सुधीर तांबे

भाऊसाहेब थोरात यांचे विचार प्रेरणास्त्रोत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे विचार सातत्याने प्रेरणास्त्रोत राहिले आहे. त्यांच्या आदर्श विचारावर सहकाराच्या माध्यमातून संगमनेर समृद्ध झाले आहे. येथील सहकार देशासाठी दिशादर्शकाचे काम करत असल्याचे गौरवोद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले.

अमृत उद्योग समूहाच्यावतीने कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी दुर्गाताई तांबे, सत्यजित तांबे, रणजीतसिंह देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. भाऊसाहेब थोरात या नावाने तालुक्यात गावोगावी प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

तांबे म्हणाले, सहकारात अलौकिक कार्याचा पाया घालणाऱ्या भाऊसाहेब थोरात यांचे विचार हे कायम प्रेरणास्त्रोत राहिले आहे. त्यांच्याच विचारावर संगमनेरमधील कार्यकर्ते सदैव काम करत आहेत. त्यांचा हाच सेवाभावी विचार देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरला. थोरात यांचा जन्मदिन तालुक्यात प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. आधुनिकता, शिस्त, काटकसर व पारदर्शकता ही तत्वे त्यांनी सहकारात रुजविली.

थोरात यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गोरगरीब व सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सहकाराचा मार्ग निवडला. थोरात यांच्या तत्त्वांमधून संगमनेरचा सहकार फुलला. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज संगमनेरचा सहकार हा देशासाठी दिशादर्शक ठरला आहे. दुष्काळी तालुका ते प्रगतशील तालुका यामध्ये विविध संस्थांची उभारणी, रचनात्मक कार्य, गोरगरिबांच्या आर्थिक सामाजिक विकास हे महत्त्वाचे काम तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनी केले. वयाच्या 84 वा वर्षी पर्यावरणाचे काम करताना त्यांनी दंडकारण्य अभियान राबवले. त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून मोठे हॉस्पिटल सुरू केले. आज हे हॉस्पिटल उत्तर महाराष्ट्रातील अनेक गरजूंसाठी आरोग्य मंदिर ठरले आहे.

तालुक्यातील प्रत्येक गावात प्रेरणा दिन साजरा

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा जन्मदिन 12 जानेवारी हा संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होतो. विविध ठिकाणी निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, प्रभात फेरी आदी उपक्रमांचे आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याचबरोबर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने अमृतेश्वर मंदिर प्रांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 119
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.