Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एबी फॉर्म मिळूनही मुलासाठी वडिलांची माघार; भाजपालाही शेवटपर्यंत ठेवले संभ्रमात
राजकारण

एबी फॉर्म मिळूनही मुलासाठी वडिलांची माघार; भाजपालाही शेवटपर्यंत ठेवले संभ्रमात

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/01/2023Updated:12/01/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नाशिक पदवीधरमध्ये आघाडीचे उमेदवार असलेले आ. डॉ. तांबेंची माघार; सत्यजित तांबे अपक्ष उमेदवार

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

नाशिक : पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांना महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर देखील शेवटच्या क्षणी त्यांनी उमेदवारी दाखल न करता मुलगा, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे याच्यासाठी थांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सत्यजित तांबे आता या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असतील.

विधान परिषद पदवीधर नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारीवरुन शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. महाविकास आघाडीच्यावतीने विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी जाहीर केली होती. तर सत्यजित तांबे यांनी भारतीय जनता पक्षाकडून लढावे यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात आले. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू होते. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात पिता-पुत्रांमध्ये लढाई होते की आणखी काही घडते याची उत्सुकता होती.Advt

गुरुवारी आमदार तांबे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नाशिकला गेले. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाची उमेदवारी मिळून देखील त्यांनी आपला अर्ज दाखल केला नाही. उलट अर्ज भरण्यास काही वेळ बाकी असतानाच त्यांनी मुलगा सत्यजित याचा उमेदवार अर्ज दाखल केला. सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडीकडून एक तर दुसरा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तांबे आपल्याकडे येतील या आशेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला या मतदारसंघात उमेदवार देता आला नाही. सत्यजित तांबे हेच भाजपाचे उमेदवार असतील अशा पद्धतीच्या बातम्या माध्यमातून येत होत्या.

मात्र सत्यजित तांबे यांच्या उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म नसल्याने हा अर्ज बाद होऊ शकतो, त्यामुळे खबरदारी म्हणून दुसरा अपक्ष अर्ज भरण्यात आला आहे. भाजपकडूनही अधिकृत उमेदवार देण्यात आला नसल्याने या मतदारसंघात आता अपक्षांमध्ये लढत अटळ आहे. डॉ. सुधीर तांबे यांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केल आहे. त्यामुळे सलग तीन टर्म आमदार असलेल्या डॉ. तांबे यांची आमदारकी आता संपुष्टात येणार आहे. तर सत्यजित तांबे यांना या मतदारसंघातून आमदारकीची संधी मिळणार असून भाजप त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊन निवडणूक बिनविरोध करणार की अपक्षांमध्ये लढत होणार हे काही दिवसात स्पष्ट होईल.

आमदार डॉ तांबे म्हणाले,

“सत्यजित तांबे युवा उमेदवार असून त्यांना उमेदवारी मिळायला हवी अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही याबाबतची कल्पना आहे. सत्यजित तांबे यांनाच उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस नेत्यांचंही म्हणणं होतं पण काही तांत्रिक चुकीमुळे आणि संवादातील त्रुटीमुळे एबी फॉर्म वेळात पोहोचू शकलेला नाही”

सत्यजित तांबे म्हणाले,

मी काँग्रेसचा उमेदवार आहे. तसंच या निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांना पाठिंब्यासाठी विनंती करणार आहे. “काँग्रेस पक्षातील पक्ष श्रेष्ठींचीही मला उमेदवारी देण्याची इच्छा होती. पक्षानं मात्र निर्णय घेताना डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली. तांत्रिक काही अडचणीमुळे शेवटच्या क्षणाला मला एबी फॉर्म मिळू शकलेला नाही. त्यामुळे मी दोन फॉर्म भरले आहेत. एक काँग्रेस आणि एक अपक्ष उमेदवार म्हणून भरला आहे. माझ्या नावाचा एबी फॉर्म वेळेवर येऊ न शकल्यानं मला अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवावी लागेल. परंतु मी उमेदवार काँग्रेस पक्षाचाच आहे. असं असलं तरी मी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना भेटून पाठिंब्याची विनंती करणार आहे. राजकीय पक्षाच्या सीमेच्या पलिकडे जाऊन माझ्या पाठिशी उभं राहावं अशी माझी अपेक्षा आहे. मला सर्वांचा पाठिंबा मिळावा असा प्रयत्न करणार आहे”. भाजपच्या उमेदवारीबद्दल सुरू असलेल्या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं ते म्हणाले. 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 459
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.